घरताज्या घडामोडीWedding Outfit : लग्नाची तयारी करताय ? मग लेहेंगा खरेदी करताना 'या'...

Wedding Outfit : लग्नाची तयारी करताय ? मग लेहेंगा खरेदी करताना ‘या’ ४ गोष्टी लक्षात ठेवाच

Subscribe

ट्रेंड फॉलो करता करता अगदी शेवटपर्यंत वधूची लग्नाची ड्रेसिंग काय असणार हेच मोठं कोडं असतं.

भागवत एकादशीपासून म्हणजे १४ नोव्हेंबर २०२१ पासून लग्नसराईच्या शुभ मुहूर्तांना सुरुवात होणार आहे. दिवाळीनंतर तुळशीचे लग्न झाले की,लग्नाची सनई वाजायला सुरुवात होते. लग्न म्हणजे दोन घरांचे मिलन, पाहुण्यांची लगबग, खरेदी, अशी सर्व लग्नाची लगेधूम सुरुच असते.या सर्व लग्नाच्या तयारीत मुलींचा फारसा वेळ हा लग्नासाठी आऊटफीट निवडण्यातच जातो. ट्रेंड फॉलो करता करता अगदी शेवटपर्यंत वधूची लग्नाची ड्रेसिंग काय असणार हेच मोठं कोडं असतं.जर वधुच्या साडी किंवा लेहेंगा खरेदीत गल्लत झाली की, पूर्ण लग्नाचा आऊटफिटच बिघडतो. मग तुम्हीपण लग्नाची तयारी करताय ?लग्नाआधी कधी न घेतलेले ब्रायडल लेंहेंगे घेताना तुमचाही गोंधळ होतोय का? मग लेहेंगा खरेदी करताना पुढील चार गोष्टी लक्षात ठेवाच.

लाल रंगाचाच लेंहेंगा घेण्यापेक्षा…

- Advertisement -

 

बदलत्या ट्रेंडनुसार आणि काळानुसार तुम्हाला हवे असल्यास तुम्ही वेगवेगळ्या रंगांचे लेहेंगेही निवडू शकता. लग्नाचा लेंहेंगा लाल रंगाचा असावा हे अजिबात आवश्यक नाही.आजकाल, बाजारात अनेक रंगांचे वधूचे लेहेंगे आहेत, जे केवळ तुमच्या सौंदर्यातच भर घालू शकत नाहीत तर, तुम्ही फॅशन ट्रेंड देखील सेट करू शकता.

- Advertisement -

स्किन टोननुसार खरेदी करा

वधू स्वतःसाठी वधूचा लेहेंगा खरेदी करताना तिच्या त्वचेच्या टोनकडे दुर्लक्ष करते. ती लेहंग्याचे सौंदर्य लक्षात ठेवते. पण तिचं कलर कॉम्बिनेशन तिच्यावर कसं दिसेल हे तिला कळत नाही. कारण प्रत्येकाच्या त्वचेचा रंग वेगळा असतो.जर तुम्हाला पिवळ्या रंगाचा लेहेंगा आवडला असेल तर तो तुमच्यावरही छान दिसेलच असे नाही. वेगवेगळ्या त्वचेच्या टोनवर वेगवेगळे रंग शोभतात. अशा स्थितीत, लेहेंगा खरेदी करण्यापूर्वी, तुम्हाला तुमच्या त्वचेच्या टोनबद्दल चांगले ज्ञान असले पाहिजे. तुमच्यावर कोणता रंग जास्त खुलून दिसतो हे लक्षात घेऊन लेहेंग्याची खरेदी करा.

फॅब्रिकची विशेष काळजी

अनेकदा लेहेंगा निवडताना, बहुतेक नववधू त्याच्या फॅब्रिकबद्दल चूक करतात, त्यामुळे संपुर्ण आऊटफिट बिघडून जातो. कधी कधी लेहेंगाच्या डिझाईनकडे लक्ष देतो, पण लेहेंगाच्या फॅब्रिककडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. लेहंगा विविध प्रकारच्या कपड्यांपासून बनवले जातात. तुम्ही त्यानुसार फॅब्रिक निवडले पाहिजे, जेणेकरून तुम्ही तुमच्या लग्नात खास दिसाल.

शरीरयष्ठीनुसार कपडे कसे निवडणार ?

अनेकदा नववधू लेहेंगाचा रंग-डिझाइन ठरवते पण तिच्या शरीराच्या आकाराचा विचार करत नाही. आपण नेहमी मॉडेल किंवा सेलिब्रिटींच्या लूकवर भाळून तसेच कपडे निवडतो. पण ते कपडे स्वत: घातल्यावर वेगळं दिसतं. याचं कारण असं की मॉडेलच्या शरीराचा आकार आणि तुमच्या शरीराच्या प्रकारात सामान्यतः खूप फरक असतो.जर तुम्हाला हे समजत नसेल तर तुम्ही फॅशन डिझायनर किंवा फॅशन स्टायलिस्टची मदत घेऊ शकता.

लेहेंगा निवडल्यानंतर, तुमच्या शरीराच्या प्रकारानुसार तो तयार करणे महत्त्वाचे आहे. लग्नापूर्वी लेंहेंगा घालून पाहा. जेणेकरून त्या लेहेंग्यात काही कमतरता असेल तर दूर होईल आणि लग्नाच्या दिवशी गडबड होणार नाही.


हे ही वाचा – Rajkummar Rao – Patralekha Wedding : राजकुमार राव- पत्रलेखाची लग्नपत्रिका व्हायरल, पाहा लग्नाचे स्थळ, वेळ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -