घरमुंबईतब्बल २ हजारांहून अधिक तळीरामांवर कारवाई झाली!

तब्बल २ हजारांहून अधिक तळीरामांवर कारवाई झाली!

Subscribe

थर्टी फर्स्टची पार्टी भोवली

अनेकदा तरुण मंडळी थर्टी फर्स्ट अर्थात वर्षअखेर ३१ डिसेंबरची पार्टी साजरी करण्याच्या नावाखाली दारू पिऊन वाहने चालवतात. यात मोठे अपघातही होतात. त्यामुळे अशा मद्यपींची झिंग उतरवण्यासाठी वाहतूक पोलिसांसह स्थानिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात येतो. तसेच अशा मद्यपींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात येतो. यंदाही ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी २० डिसेंबर रोजी वाहतूक विभागामार्फत आयोजित एका कार्यक्रमात तळीरामांवर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा दिला होता. त्यानुसार ठाणे वाहतूक विभागाने थर्टी फर्स्ट डिसेंबरला ठाणे शहरातील तब्बल १०० नाक्यांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आणि मद्यपी तळीरामांवर १ जानेवारीच्या पहाटेपर्यंत करडी नजर ठेवण्यात आली. यामध्ये सुमारे २०७१ तळीरामांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.

नववर्षाचे स्वागतासाठी रंगणार्‍या पार्ट्यांवर अमली विरोधी पथकासह विविध पथकांनी रेव्ह पार्टीवर करडी नजर ठेवली होती. ठाणे शहर, भिवंडी, कल्याण, उल्हासनगरमधील १८ युनिटने ही कामगिरी बजावली. यामध्ये तब्बल ३ हजार पोलीस कर्मचार्‍यांचा फौजफाटा आणि ४५० वाहतूक पोलीस, ८ अप्पर आयुक्त, १५ ते २० सहआयुक्त, ९० वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सह पोलीस निरीक्षक असा ५४ ठिकाणी ड्रंक अँड ड्राइव्हचा सहभाग होता. थर्टी फर्स्ट नाईटच्या पार्श्वभूमीवर नाक्यानाक्यांवर वाहन तपासणी केली गेली. येऊर, उपवन, घोडबंदर मार्गासह ठाण्यात अनेक ठिकाणी काही हॉटेलमध्ये थर्टी फर्स्टच्या निमित्ताने पार्ट्या होतात. त्यामुळे मद्यप्राशन करुन वाहनं चालवण्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील सर्वच ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. म्हणूनच नववर्ष स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री झिंगणार्‍या आणि वाहतुकीचे नियम तोडणार्‍यांवर कायद्याचा दंडूका बसला आहे, असे मत ठाणेकर व्यक्त करत आहेत.

- Advertisement -

ड्रंक अँड ड्राईव्ह करणार्‍यांवर याआधी कारवाईच्या नावाखाली लायसन्स जप्ती किंवा फाईन घेतला जात असे. मात्र त्याच अवस्थेत हे लोक पुढे जात असत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढतच होते. अशा परिस्थितीत केवळ फाईन घेऊन त्यांना सोडून देणे म्हणजे पुन्हा अपघाताला निमंत्रण देण्यासारखेच होते. यावर अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ डिसेंबरच्या रात्री २०१७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्या गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत.

पार्ट्यांसाठी कायमच आकर्षणाचे ठिकाण असलेल्या ठाण्यातील येऊर परिसरातदेखील थर्टी फर्स्टच्या रात्री वन विभाग, पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे कडक सुरक्षा तैनात करण्यात आली होती. येऊरच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांनी सुरक्षा ठेवल्याने या ठिकाणी पर्यटकांना प्रवेश नव्हता. येऊर गावात पाटोणापाडा, वनीचापाडा, डीएसपी गेट या परिसरात वन विभागाचे कर्मचारी गस्त घालून होते. त्यामुळे या ठिकाणी होत असलेल्या पार्ट्यांना आळा बसल्याचा दावा वन विभागातर्फे करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -