घरलाईफस्टाईलवर्ल्ड मेरीटाईम डे

वर्ल्ड मेरीटाईम डे

Subscribe

५ एप्रिल हा दिवस जगभरात वर्ल्ड मेरीटाईम डे म्हणून साजरा केला जातो. यंदा मेरीटाईम क्षेत्रात महिलांचे सबलीकरण या धर्तीवर हा दिवस संपूर्ण जगभरात साजरा केला जाणार आहे. आपणा सर्वांनाच माहीत आहे की, मेरीटाईम क्षेत्रात आजही पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण कमीच आहे. तेव्हा या क्षेत्रातही महिलांचे प्रमाण वाढवण्यासाठी तसेच स्त्री-पुरुष समानता मूल्य जपण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन तर्फे यंदा स्त्री – पुरुष समानतेचे महत्त्व आणि त्याबद्दल जागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. युनायटेड नेशन्सच्या शाश्वत विकासाचे ध्येय आणि त्याआधारे मेरीटाईम क्षेत्रात महिलांचे अद्याप पुढे न आलेले योगदान या कार्यक्रमांद्वारे जगासमोर आणण्याचे काम इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन करणार आहे.

मेरीटाईम क्षेत्रात महिलांचे सबलीकरण या धर्तीवर इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन मेरीटाईम स्टेकहोल्डर्सशी हातमिळवणी करून या क्षेत्रात महिलांसाठी करिअरच्या विविध संधी उपलब्ध करण्याचे काम करणार आहे.आतापर्यंत इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन तर्फे महिलांना मेरीटाईम जगतातील करिअरच्या संधी देण्यासाठी प्रयत्न केल्यानेच पूर्वी केवळ पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात आज महिलाही जागतिक स्तरावरील बंदरे, मेरीटाईम प्रशासनात विविध पदांवर काम करत आहेत. यापुढेही मेरीटाईम क्षेत्रात स्त्री- पुरुष समानतेची मूल्ये रुजवत जगाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणार्‍या स्वच्छ, सुरक्षित समुद्री प्रवासाचा सुकाणू महिलांच्या हाती देण्याच्या इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनच्या कार्याला शुभेच्छा देऊयात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -