घरमहा @२८८बाळापूर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २९

बाळापूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २९

Subscribe

अकोला जिल्ह्यातील बाळापूर (विधानसभा क्र. २९) विधानसभा मतदारसंघ आहे.

अकोला जिल्ह्यातील बाळापूर हा क्रमांक २९ वा विधानसभा मतदारसंघ आहे. बाळापूर हे विदर्भातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. कधीकाळी मुघलांची या भागातील राजधानी म्हणून बाळापूर ओळखले जाते. अकोला जिल्ह्यातील राजकीय प्रयोगांची भूमी म्हणजेच बाळापूर विधानसभा मतदारसंघ आहे. कारण गेल्या ३० वर्षांपासून या मतदारसंघाने सर्वच राजकीय पक्षांना प्रतिनिधित्व दिले आहे. सलग दुसऱ्यांना निवडून येण्याचा पायंडा भारिपच्या बळीराम सिरस्कार यांनी मागच्या निवडणुकीत मोडीत काढला. परंतू तिसऱ्यांदा निवडून येण्याआधी त्यांच्या मार्गात उमेदवारी मिळण्याचा मोठ अडसर आहे. अशीच स्थिती सर्वच पक्षांतील इच्छुकांसंदर्भात आहे. त्यामुळे या मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांचे चित्र अद्यापही काहीचे धुसर आहे.

मतदारसंघ क्रमांक – २९

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

- Advertisement -

पुरुष – १,४७,०८३

महिला – १,३२,२४१

एकूण मतदार – २,७९,३२६

विद्यमान आमदार – बळीराम भगवान सिरस्कार, भारिप

गेल्या काही वर्षात प्रकाश आंबेडकर यांच्या भरीप बहुजनमहासंघाने या विधानसभा मतदारसंघावर आपली पकड मजबूत केली आहे. कारण गेल्या २५ वर्षांपासून या मतदारसंघाने सर्वच राजकीय पक्षांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. मुस्लीम मतदारांचे प्राबल्य असून इथल्या मतदारांनी सामाजिक बंधूभाव नेहमीच जपला आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत भारिप बहुजन महासंघात तिकीट वाटप नाट्यात लॉटरी लागलेल्या बळीराम सिरस्कार यांना मतदारांनी निवडून दिले. बळीराम सिरस्कर यांनी काँग्रेसच्या रजीयाबी खतीब यांचा १५९० मतांनी परभाव केला.

MLA baliram bhagwan sirskar
आमदार बळीराम भगवान सिरस्कार

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) बळीराम भगवान सिरस्कार, भारिप – ४१,४२६

२) अॅड. नतिकोद्दीन खतीब, काँग्रेस – ३४,४८७

३) तेजराव थोरात, भाजप – ३०,७४१

४) संदीप पाटील, अपक्ष – १८,५४७

५) नारायण गव्हाणकर, अपक्ष – १६,२३०

हे वाचा – ६ – अकोला लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -