घरमहा @२८८बारामती विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २०१

बारामती विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २०१

Subscribe

पुणे जिल्ह्यातील बारामती हा (विधानसभा क्र. २०१) विधानसभा मतदारसंघ आहे.

पुणे जिल्ह्यातील बारामती हा क्रमांक २०१ चा विधानसभा मतदारसंघ आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ प्रत्येक निवडणुकीमध्ये विशेष चर्चेचा असतो. पवार कुटुंबाचा परंपरागत मतदारसंघ म्हणून ओळख असली तरी पवार कुटुंबीयांना निवडणुकीत कोण आव्हान देणार याकडेही सर्वांचे लक्ष असते. या मतदारसंघात एकूण ३५२ मतदान केंद्र आहेत.

बारामती हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा मतदार संघ आहे १९५२ मध्ये देशाच्या पहिल्या निवडणुकीत हा मतदारसंघ आस्तित्वात नव्हता, १९५७ च्या निवडणुकीच्या वेळी या मतदारसंघाचे गठन केले गेले. हा मतदारसंघ पुणे जिल्ह्यात येतो व बारामती शहर हे तालुक्याचे मुख्यालय देखील आहे. बारामती लोकसभा मतदार संघात ६ विधानसभा क्षेत्र येत असून बारामती हा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

- Advertisement -

मतदारसंघ क्रमांक – २०१

मतदारसंघ आरक्षण – खुला

- Advertisement -

मतदारांची संख्या

पुरुष – १,६२,८३७

महिला – १,४७,१५५

एकूण मतदार – ३,०९,९९३


विद्यमान आमदार – अजित अनंतराव पवार

अजित पवारांचे शालेय शिक्षण देवळाली प्रवरा येथेच झाले. त्यानंतर ते मुंबईत त्यांचे काका शरद पवार यांच्याकडे दहावीनंतरच्या शिक्षणासाठी आले. तोपर्यंत शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीने चांगलाच वेग घेतला होता. महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण करून पवारांनी पुन्हा बारामती गाठली या कर्मभूतीतील सहकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरवात केली. थोड्याच वेळात अजित पवारांनी या क्षेत्रात चांगली पकड घेतली. यानंतर १९९१ ला त्यांची पुणे मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि त्याचवर्षी ते विधानसभा निवडणूकीत भरघोस मतांनी निवडूनही आले. या विजयानंतर त्यांना कृषी, फलोत्पादन आणि उर्जा राज्यमंत्री झाले. त्याबरोबरच याच वर्षाच्या जून ते सप्टेंबर दरम्यान त्यांनी लोकसभेच्या निवडणूकीत आपला झेंडा रोवला आणि खासदार बनत संसद गाठली. त्यानंतर अजित पवारांनी फिरकूनही मागे पाहिले नाही.

अजित अनंतराव पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असून त्यांनी २०१४ साली १,५०,५८८ मतांनी विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात उभे असणारे भारतीय जनता पक्षाचे बाळासाहेब गावडे उभे होते. यावेळी त्यांना ६०,७९७ मतं मिळाले होते.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

  • अजित अनंतराव पवार, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष – १,५०,५८८
  • बाळासाहेब गावडे, भारतीय जनता पक्ष – ६०,७९७
  • राजेंद्र काळे, शिवसेना – ४,०८६
  • आकाश मोरे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – ४,०१३
  • अनिल पोटरे, बहुजन समाज पक्ष- ३,३४९

नोटा – १६१५

मतदानाची टक्केवारी – ७३.६९%


हेही वाचा – बारामती विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २०१

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -