घरमहा @२८८धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ – म.क्र. ६

धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ – म.क्र. ६

Subscribe

धुळे जिल्ह्यातील धुळे ग्रामीण (विधानसभा क्र.६) विधानसभा मतदारसंघ आहे.

धुळे जिल्ह्यातील धुळे ग्रामीण हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. २००९ मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचना मध्ये हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी सोडण्यात आला. धुळे शहर व पुर्वाश्रमीच्या कुसुंबा मतदार संघात बदल करुन कुंसुंबा ऐवजी धुळे ग्रामीण हा मतदार संघ तयार झाला. हा मतदारसंघ धुळे शहर मतदारसंघाभोवती असणारी खेडी एकत्र करुन तयार झाला असुन यात मोठया प्रमाणावर मराठा , माळी , दलित मतदार आहेत. मोठया प्रमाणावर शेतकरी मतदार असणारा हा मतदार संघ आता पावेतो काँग्रेसचा बालेकिल्ला राहीला आहे.

मतदार संघ क्रमांक :

- Advertisement -

मतदार संघ आरक्षण : खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,९३,१४०
महीला – १,७८,६००
तृतीयपंथी – १
एकुण मतदार ३,७१,७४१

- Advertisement -

विदयमान आमदार – कुणाल पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

माजी खासदार चुडामण पाटील यांचे नातु तसेच राज्याचे माजी मंत्री रोहीदास पाटील यांचे पुत्र आमदार कुणाल पाटील यांनी प्रथम जिल्हा परीषदेची निवडणुक लढवली. पण त्यात त्यांना यश आले नाही. यानंतर त्यांनी २०१४ मधे धुळे ग्रामीण मतदार संघातुन निवडणुक लढवली.यात त्यांनी शिवसेनेच्या तत्कालीन आमदाराचा मोठया फरकाने पराभव केला.देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असतांनाही आ कुणाल पाटील यांनी मोठया फरकाने भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केला.

धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आमदार कुणाल पाटील

२०१४ विधानसभा निवडणुकीची परीस्थिती

आमदार कुणाल पाटील – काँग्रेस – १,१९,०९४
मनोहर भदाणे – भाजपा – ७३,०१२
प्रा शरद पाटील – शिवसेना – १५,०९३
किरण पाटील – राष्ट्रवादी – १७,६८२


हे ही वाचा –  धुळे लोकसभा मतदारसंघ


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -