घरमहा @२८८दिंडोशी विधानसभा मतदारसंघ - म. क्र. १५९

दिंडोशी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १५९

Subscribe

दिंडोशी (विधानसभा क्र. १५९) हा मुंबई उपनगरातला विधानसभा मतदारसंघ आहे.

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातला दिंडोशी हा दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेचे समसमान म्हणजेच प्रत्येकी ३ आमदार आहेत. दिंडोशी विधानसभा मतदारसंघात आयटी पार्क आणि विविध सेवा कंपन्यांची ऑफिसेस आहेत. या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर नागरी सुविधांचे प्रश्न महत्त्वाचे ठरत असून त्यावरच काँग्रेसची सद्दी संपवत २०१४मध्ये मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात लोकांनी शिवसेनेच्या गजानन किर्तीकरांच्या पारड्यात कौल टाकला. दिंडोशीतही २००९मधील विजेते काँग्रेसचे राजहंस सिंह यांचा पराभव करत सुनील प्रभू यांना मतदारांनी पसंती दिली होती. या मतदारसंघात एकूण २४५ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १५९

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,७५,२४७
महिला – १,२२,२४५

- Advertisement -

एकूण मतदार – २,९७,४९२


sunil prabhu, shivsena mla
सुनील प्रभू

विद्यमान आमदार – सुनिल प्रभू, शिवसेना

२००९मध्ये काँग्रेसच्या राजहंस सिंह यांच्याकडून ६ हजार मतांनी पराभव पत्कराव्या लागलेल्या सुनील प्रभू यांनी २०१४च्या मोदी लाटेमध्ये जोरदार मुसंडी मारत राजहंस सिंह यांचा तब्बल २० हजार मतांनी पराभव केला. सुनील प्रभू पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेले असले, तरी शिवसेनेसोबत ते सुरुवातीपासूनच होते. मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात त्यांनी दीर्घकाळ शिवसेनेचं प्रतिनिधित्व केलं आहे. २०१२ ते २०१४ या काळात ते मुंबईचे महापौर देखील होते. १९९७पासून ते २०१४पर्यंत ते पालिकेच्या राजकारणात होते.


विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) सुनिल प्रभू, शिवसेना – ५६,५७७
२) राजहंस सिंह, काँग्रेस – ३६,७४९
३) मोहीत कंबोज, भाजप – ३६,१६९
४) शालिनी ठाकरे, मनसे – १४,६६२
५) अजित रावराणे, राष्ट्रवादी – ८५५०

नोटा – ११३९

मतदानाची टक्केवारी – ५३.६३ %


हेही वाचा – मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -