घरमहा @२८८लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २३४

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २३४

Subscribe

लातूर जिल्ह्यातील लातूर ग्रामीण (विधानसभा क्र. २३४) विधानसभा मतदारसंघ आहे.

लातूर जिल्ह्यातील लातूर ग्रामीण हा क्रमांक २३४ वा विधानसभा मतदारसंघ आहे. लातूर ग्रामीण हा मतदारसंघ २००९ च्या मतदारसंघ पुनर्रचनेत तयार झाला आहे. आधी शिवराज पाटील आणि नंतर विलासराव देशमुख यांच्यामुळे लातूरवर काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. १९७२ आणि १९७८ मध्ये चाकूरकर आणि १९८० पासून आजपर्यंत विलासराव देशमुख यांचा प्रभाव आहे. मांजरा, विकास, रेणा साखर कारखान्याचा ग्रामीण भागावर प्रभाव आहे. यामुळे या मांजरा नदीच्या पट्ट्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जाळे तयार झाले आहे. त्याचे आर्थिक हितसंबंध या कारखान्याशी आणि पर्यायाने देशमुख परिवाराच्या राजकारणाशी जोडले गेले आहेत. या मतदार संघाच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा देशमुखांनी येथे वैजनाथ शिंदे यांना २००९ मध्ये उमेदवारी दिली, ते निवडूनही आले. त्यानंतर त्र्यंबक भिसे यांना २०१४ उमेदवारी देण्यात आली, तेही निवडून आले. या मतदारसंघातून दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज देशमुख नशीव आजमावण्याच्या तयारीत आहेत.

मतदारसंघ क्रमांक – २३४

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

- Advertisement -

पुरुष – १,५६,५८१

महिला – १,३६,९८०

एकूण मतदार – २,९३,५६१

विद्यमान आमदार – त्र्यंबकराव भिसे, काँग्रेस

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा देशमुखांनी येथे वैजनाथ शिंदे (२००९) यांना उमेदवारी दिली, ते निवडूनही आले. त्यानंतर त्र्यंबकराव भिसे (२०१४) यांना उमेदवारी देण्यात आली, तेही निवडून आहे. मात्र यंदा लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता, माजी आमदार वैजनाथ शिंदे आणि विद्यमा आमदार त्र्यंबकराव भिसे यांची राजकीय कोंडी करून कै. विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आणि लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित देशमुख यांचे भाऊ धीरज देशमुख यांनी स्वतःच्या उमेदवारीचे घोडे दामटण्याने मतदार संघात अस्वस्थता आहे.

trimbakrao bhise
आमदार त्र्यंबकराव भिसे

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) त्र्यंबकराव भिसे, काँग्रेस – १,००,८९७

२) रमेश कराड, भाजप – ९०,३८७

३) हरिभाऊ साबडे, शिवसेना – ३,०८५

४) संतोष नागरगोजे, मनसे – २,७८५

५) आशाबाई भिसे, राष्ट्रवादी – २,६७२

हेवाचा – ४१ – लातूर लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -