घरमहाराष्ट्रप्रेरणादायी: वडिलांच्या पार्थिवाजवळ दहावीच्या विद्यार्थिनीने केला अभ्यास

प्रेरणादायी: वडिलांच्या पार्थिवाजवळ दहावीच्या विद्यार्थिनीने केला अभ्यास

Subscribe

वडिलांच्या निधनाने प्रणाली हादरून गेली. धीर देणारे वडील अचानक सोडून गेल्याने ती कोलमडून पडली. मात्र तिने रात्रभर अभ्यास करुन परिक्षा दिली.

‘आमच्यावर जे दिवस आले ते तुझ्या वाट्याला येऊ नये, त्यासाठी शिक्षण घेऊन मोठी हो,’ असा कानमंत्र दिलेल्या वडिलांचा ऐन परीक्षेच्या तोंडावर मृत्यू होतो. तरीही मनोधैर्य खचू न देता दहावीच्या विद्यार्थीनी वडिलांच्या पार्थिवाजवळ बसून अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशी पेपर दिला. पेपर संपल्यानंतर तिच्या वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील खैरी पट येथील ही हृदयद्रावक घटना आहे.

परिक्षेच्या आदल्या दिवशी वडिलांचे निधन

प्रणाली खेमराज मेश्राम असं या मुलीचे नाव आहे. प्रणाली खांदूर तालुक्यातील खैरी/पट या गावात आई, वडील आणि एका भावासोबत राहते. तिचे वडील एस.टी. महामंडळात बस चालक म्हणून काम करत होते. स्वत:वर अनुभवलेले दिवस मुलांवर येऊ नये, म्हणून दोन्ही मुलांनी शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहावे हा त्यांचा ध्यास होता. प्रणालीला ते अभ्यासासाठी नेहमीच प्रेरित करीत होते. प्रणाली यंदा दहावीला आहे. तिचे बोर्डाचे पेपर सुरू आहेत. परंतू, परीक्षेच्यापूर्वी प्रणालीच्या वडिलांना कर्करोगाने ग्रासले. ब्रह्मपुरी आणि नागपूर येथे उपचार सुरू होते. मंगळवारी, ५ मार्च रोजी इंग्रजीचा पेपर होता. मात्र आदल्या दिवशी रात्री आठ वाजता प्रणालीच्या वडिलांचे निधन झाले. मेश्राम कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

- Advertisement -

परिक्षा दिल्यानंतर वडिलांवर अंत्यसंस्कार

वडिलांच्या निधनाने प्रणाली हादरून गेली. धीर देणारे वडील अचानक सोडून गेल्याने ती कोलमडून पडली. प्रणाली शिक्षण घेत असलेल्या लाखांदूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक आणि शिक्षक प्रणालीच्या घरी आले. प्रणालीला त्यांनी धीर दिला. घडल्या प्रकाराबद्दल दु:ख व्यक्त करून, आता वडिलांचे स्वप्न पूर्ण कर. दु:ख बाजूला ठेवून परीक्षेला सामोरी जा, असा सल्ला दिला. प्रणालीलाही ते पटले आणि तिने दुःख बाजूला सारत पहाटेपर्यंत अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परीक्षा दिली. परीक्षा संपल्यानंतर वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रणालीचे होतेय कौतुक

आज वडील गेल्यामुळे प्रणालीवर दुःखाचा डोंगर कोसळला असला तरीही तिने खचून न जाता परिक्षा देत आहे. तर तिला पुढे जाऊन मोठे अधिकारी होऊन हयात नसलेल्या आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्यामुळे आज तिने दाखविलेली शैक्षणिकवृत्ती तालुक्यात कुतुहलाचा विषय ठरत आहे. प्रणालीच्या या प्रेरणादायी कहाणीचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -