घरमहाराष्ट्रनाशिकमहिला महाविद्यालयातील ११५ विद्यार्थिनी परीक्षेला मुकल्या

महिला महाविद्यालयातील ११५ विद्यार्थिनी परीक्षेला मुकल्या

Subscribe

विद्यापीठात नावांची नोंद नसल्याने गोंधळ; संस्था संचालकांची विद्यापीठाशी चर्चा, नव्याने परीक्षा घेण्याचे आश्वासन

नाशिक येथील के. एन. केला महिला महाविद्यालयातील सुमारे ११५ विद्यार्थिनींची विद्यापीठाकडे नोंद नसल्याचे ऐन परीक्षेच्या दिवशी उघड झाल्याने प्रचंड गोंधळ उडाला होता, शैक्षणिक वर्ष वाया जाण्याच्या भीतीने विद्यार्थिनींनी प्रभाग सभापती प्रशांत दिवे यांच्या माध्यमातून संस्था संचालकांशी चर्चा केली. यावेळी साने गुरुजी शिक्षण प्रसारकचे अध्यक्ष प्रवीण जोशी यांनी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, विद्यापीठाशी चर्चा झाल्याप्रमाणे नव्याने परीक्षेचे नियोजन करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्याने विद्यार्थिनींना दिलासा मिळाला आहे.

येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या आवारात मुंबईच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठांतर्गत के. एन. केला महिला महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या सुमारे ११५ विद्यार्थिनींची चक्क विद्यापीठाकडे नोंदच नसल्याने प्रचंड गोंधळ उडाला. मुलींना परीक्षेला मुकावे लागल्याने संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाण्याच्या भीतीने पालक व विद्यार्थ्यांत संताप व्यक्त केला जात आहे. बुधवारी कला द्वितीय, तृतीय, वाणिज्य द्वितीय, तृतीय, एमए द्वितीय व एम.कॉम. द्वितीय अशा एकूण ११५ विद्यार्थिनींची परीक्षा बुधवारी होती. परीक्षेच्या वेळी लिंक ओपन न झाल्याने हा गोंधळ उडाला.

- Advertisement -

काही विद्यार्थिनींनी प्रभाग सभापती प्रशांत दिवे यांच्याकडे केल्यानंतर, गुरुवारी सकाळी महाविद्यालयात झालेल्या बैठकीत दिवे यांनी विद्यार्थिंनींचे शैक्षणिक वर्ष वाया गेल्याने संस्था चालकांना, वर्गाच्या शिक्षकांना धारेधर धरत प्रश्न तत्काळ सोडवण्याची मागणी केली. साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण जोशी यांनी विद्यापीठात संपर्क साधत गंभीर प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आवश्यक ते निर्णय घेण्यात येतील व विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही व पुन्हा परीक्षा होईल असे आश्वासन दिले. यावेळी प्राचार्या अश्विनी दापोरकर, प्रा. अशिष कुटे, विद्यार्थिनी मनाली पांडे, अश्विनी निकम, गायत्री ससाने, सुशिला परदेशी, भक्ती म्हस्के, लक्ष्मी जाधव, जयश्री घोडेराव, अपुर्वा शार्दुल, हर्षदा काळे, पूजा भालेराव, रुपाली बहादुरे, स्वाती सांगळे, निकिता सिनारे, अश्विनी बोरुडे, साक्षी चव्हाण, सुश्मिता पवार, दीपाली पवार, माधुरी कांबळे, दीपमाला श्रीवंत, रुपाली लोखंडे, पूनम लाटे, पूजा पगारे आदी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

महाविद्यालयाची फी अधिकृत शिक्षक, मुख्याध्यापक किंवा शाळेच्या अकाऊंटवर जमा करणे आवश्यक असतांना विद्यालयाच्या फिची रक्कम प्राध्यापकाच्या पत्नीच्या अकाऊंटवर टाकायला सांगितले होते. हे चुकीचेच आहे.
– जयश्री घोडेराव, विद्यार्थिनी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -