Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी धक्कादायक! शेजाऱ्यांसोबतच्या भांडणापायी महिलेने १४ महिन्यांच्या मुलाला आणि ३ वर्षांच्या मुलीला दुसऱ्या...

धक्कादायक! शेजाऱ्यांसोबतच्या भांडणापायी महिलेने १४ महिन्यांच्या मुलाला आणि ३ वर्षांच्या मुलीला दुसऱ्या मजल्यावरून फेकले

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण पसरले आहे. पण यादरम्यान अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. शेजाऱ्यांसोबत भांडण झाल्याने एका महिलेने १४ महिन्यांच्या बाळाला आणि ३ वर्षांच्या मुलीला दुसऱ्या मजल्यावरून फेकल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. यामुळे १४ महिन्यांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला असून या महिलेने घटनेनंतर स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

औरंगाबादच्या वाळूज परिसरातील बजाजनगर जिजामाता कॉलनीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. ३० वर्षांच्या महिलेने शेजाऱ्याशी झालेल्या भांडणानंतर रागाच्या भरात आपल्या १४ महिन्यांच्या मुलाला आणि ३ वर्षांच्या मुलीला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकले. या घटनेत १४ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला असून ३ वर्षांची मुलगी गंभीररित्या जखमी झाली आहे. तसेच महिलेने देखील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ती देखील गंभीररित्या जखमी झालेली आहे. महिलेवर सध्या खाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमागचं नेमकं कारण काय आहे? याचा तपास सुरू आहे.


- Advertisement -

हेही वाचा – नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर केला सतत बलात्कार, लग्न ठरल्याचे समजताच आरोपीने सासरच्यांना पाठवला अश्लील व्हिडिओ


 

- Advertisement -