आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात १४० जणांना विषबाधा

food poising to 115 students in bhandara
प्रातिनिधिक छायाचित्र

आज देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होत असताना अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात मात्र धक्कादायक घटना घडली आहे. अकोट तालुक्यातील हिंगणी गावात जयंतीनिमित्त जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र जेवण झाल्यानंतर तब्बल १४० लोकांना जेवणातून विषबाधा झाली आहे. यापैकी २७ लहान मुलांचाही समावेश आहे. विषबाधा झालेल्या लोकांना सर्वोपचार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हिंगणी येथे दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यावर्षी जेवण झाल्यानंतर दुपारी लहान मुलांना उलट्या सुरु झाल्या. त्यानंतर एक एक करत गावातील १४० लोकांना विषबाधा झाल्याचे समोर आले. या सर्वांना तात्काळा उपचारासाठी सर्वोपचार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यामध्ये दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.