घरमुंबईनवी मुंबईत जयंतीच्या मिरवणुकीत जनरेटरने पेट घेतला

नवी मुंबईत जयंतीच्या मिरवणुकीत जनरेटरने पेट घेतला

Subscribe

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीतील जनरेटरने अचानक पेट घेतला. यामुळे मिरवणुकीत सहभागी लोकांची एकच धावपळ झाली. नवी मुंबईतील कामोठेमध्ये हा प्रकार घडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आज कामोठेत भव्य रॅली काढण्यात आली होती. रॅलीतील विद्युत रोषणासाठी हा जनरेटर लावण्यात आला होता. ही मिरवणूक सेक्टर ८ जवळील मानसरोवर कॉम्प्लेक्स समोर येताच मिरवणुकीतील जनरेटरने अचानक पेट घेतला. मिरवणुकीत सहभागी लोकांची एकच धावपळ झाली. काही लोकांनी प्रसंगावधान राखून लोकांना बाजुला सारून तात्काळ अग्निशमन दलाला बोलावलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -