घरताज्या घडामोडीCorona Update: राज्यात ११,७४९ नव्या रुग्णांची नोंद, ३३९ जणांचा मृत्यू

Corona Update: राज्यात ११,७४९ नव्या रुग्णांची नोंद, ३३९ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात गेल्या २४ तासांत ११ हजार ७४९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज ३३९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३४ लाख ९२ हजार ९६६ नमुन्यांपैकी ६ लाख ५७ हजार ४५० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर राज्यातील मृत्यूदर ३.३० टक्के एवढा असून राज्यात ११ लाख ९२ हजार ६८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर ३५ हजार १३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच सध्या राज्यात १ लाख ६४ हजार ५६२ रुग्ण Active आहेत.

- Advertisement -

राज्यात ३२६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४२, ठाणे १७, नवी मुंबई मनपा ११, कल्याण डोंबिवली मनपा ७, वसई विरार मनपा५, पालघर ११, नाशिक १६, पुणे ६३, पिंपरी चिंचवड मनपा १८, सोलापूर ८, सातारा १३, कोल्हापूर २०, सांगली १२, नागपूर १७ आणि अन्य १ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ३३९ मृत्यूंपैकी २६० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३१ मृत्यू पुणे १०, ठाणे ९, नाशिक ३, अहमदनगर २, कोल्हापूर २, नंदुरबार १, सांगली १, सातारा १, सोलापूर १ आणि पालघर १ असे आहेत. आज ११,७४९ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ४,७०,८७३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.६२ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात ११ हजार ७४९ रुग्ण बरे

दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यात ११ हजार ७४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ४ लाख ७० हजार ८७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.६२ टक्के एवढे झाले असून सध्या मृत्यूदर ३.३० टक्के एवढा आहे.

- Advertisement -

हेही वाचा – जनजागृती झाली आता तरी कोरोनाची कॉलरट्यून बंद करा; मनसेची मागणी


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -