घरदेश-विदेशदेशात १४२ ड्रग्स सिंडिकेट कार्यरत, २० लाख लोक व्यसनी

देशात १४२ ड्रग्स सिंडिकेट कार्यरत, २० लाख लोक व्यसनी

Subscribe

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची धक्कादायक माहिती

देशात अंमली पदार्थांचे फार मोठे जाळे पसरवण्यात आले आहे. त्यात पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रांसह गुन्हेगारी टोळ्याही कार्यरत आहेत. २०२० सालच्या आकडेवारीनुसार, गेल्यावर्षी देशात १,४०,००० कोटी रुपयांच्या हेरॉईनचा व्यापार झाला होता. देशात १४२ ड्रग्स सिंडिकेट कार्यरत आहेत आणि २ दशलक्ष व्यसनी लोक आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) केलेल्या एका विश्लेषणात ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या ड्रग्सच्या व्यापारामुळे चित्रपट उद्योगांवरही परिणाम झाला आहे.

मुंबईतील एनसीबीच्या छाप्यांदरम्यान भारतीय लष्कराने एलओसीजवळ उरी सेक्टरमध्ये २५ ते ३० किलो हेरॉईन आणि इतर ड्रग्ज पकडले आहेत. त्याची किंमत ३० कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. संयुक्त सुरक्षा दलाने विशेष कारवाई करताना या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यापूर्वी, एनसीबीने गुजरातमधील रेल्वे स्थानकावरून एक किलो मेथामफेटामाइन बाळगल्याप्रकरणी तीन जणांना अटक केली होती. या नशेची किंमत अंदाजे १ कोटी रुपये आहे. या सर्व प्रकरणांवरून देशात पसरलेले ड्रग्सचे जाळे दिसून येत आहे.

- Advertisement -

एनसीबीच्या विश्लेषणानुसार, या सिंडिकेटचे पश्चिम युरोप, कॅनडा, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका आणि पश्चिम आशियातील देशांशी संबंध आहेत. एनसीबीच्या अंदाजानुसार दरवर्षी ३६० मेट्रिक टन किरकोळ हेरॉईन आणि सुमारे ३६ मेट्रिक टन बल्क हेरॉईनची भारतातील विविध शहरांमध्ये तस्करी केली जाते. आकडेवारीनुसार २ दशलक्ष व्यसनी दररोज सुमारे १,००० किलो उच्च दर्जाच्या हेरॉईनचे सेवन करतात.

देशभरातून ७४,६२० जणांना अटक

पंजाब देशात अंमली पदार्थांच्या तस्करीचे केंद्र आहे. गेल्या वर्षी राज्यातून १५,४४९ लोकांना अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी अटक करण्यात आली होती. ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एनडीपीएस कायद्याअंतर्गत एकूण ७४,६२० जणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी झालेल्या एकूण १८,६०० जणांना अटक केलेल्यांपैकी ५,२९९ जण पंजाबमधील आहेत. देशभरात कार्यरत असलेल्या सिंडिकेटपैकी २५ पंजाब, हिमाचल प्रदेश आणि हरियाणाच्या भागातून कार्यरत आहेत. राजस्थानमध्ये ९ सिंडिकेट आहेत. एनसीबीच्या विश्लेषणानुसार, केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्वीपमध्ये सुमारे १० मोठे सिंडिकेट आहेत.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -