घरमहाराष्ट्रराज्यात २ कोटींहून अधिक किमतीचा गुटखाजन्य पदार्थ जप्त

राज्यात २ कोटींहून अधिक किमतीचा गुटखाजन्य पदार्थ जप्त

Subscribe

ठाणे शहर पोलिसांची कारवाई ; तिघांना घेतले ताब्यात

राज्यात गुटखा पान मसाला, सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखू यासारख्या अन्नपदार्थांना विक्री करण्यास बंदी असताना, त्याची अवैधरित्या गोडावुनमध्ये साठवणूक करून त्यानंतर विक्रीसाठी वाहतूक करणार्‍या चार वाहनांवर कारवाई करत, ठाणे शहर पोलिसांनी दोन कोटींहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले असून ही कारवाई भिवंडी अंजुरफाटा येथे करण्यात आली आहे.

भिवंडी,अंजुरफाटा, कामन रोडवर, जैन मंदिराचे समोर, येथून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यात शासनाने अन्नपदार्थ प्रतिबंधित केलेला गुटखा पान मसाला, सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखू असे अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल नरसिंग क्षीरसागर यांना मिळाली होती. त्यानुसार ठाणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे कक्षेने अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत चार वाहनांसह एका गोडावूनवर छापा टाकत, गुटखा व तंबाखुजन्य पदार्थाचा साठा जप्त केला.

- Advertisement -

यावेळी केलेल्या तपासणीत कोणत्याही प्रकारची कागदपत्रे, खरेदी बिले, विक्री बिले तसेच अन्न सुरक्षा मानदे कायद्याअंर्तगत अन्न परवाना / नोंदणी प्रमाणपत्र घेतले नसल्याचे आढळून आले आहे. या कारवाईत एकुण २ कोटी १ लाख २३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई, मालमत्ता गुन्हे कक्षाचे सहा पोलीस निरीक्षक मिलीन पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र दळवी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शामराव कदम, नामदेव देशमुख, स्वप्निल प्रधान, पोलीस हवालदार गणेश पाटील, वसंत बेलदार, बाळासाहेब भोसले, अर्जुन करळे,रूपवंतराव शिंदे, आशा गोळे, सुवर्णा जाधव, पोलीस कॉन्स्टेबल नरसिंग क्षीरसागर , अरविंद शेजवळ यांनी केलेली आहे. तसेच भिवंडी गुन्हे शाखा युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होनमाने व त्यांच्या पथकाने ही कारवाई करण्यासाठी मदत केली आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -