संतापजनक! १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

नोकरीचे प्रलोभन दाखवून एका १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना वर्धा येथे घडली आहे.

girl raped;
अत्याचार

सध्या देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असताना दुसरीकडे मात्र, एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्धा येथे एका १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी सहा आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.

नेमके काय घडले?

गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्याच्या घटनांचे प्रमाण वाढले असून अशीच एक घटना काल शनिवारी वर्धा येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार; शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास एका १९ वर्षाच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडित तरुणीला नोकरीचे प्रलोभन दाखवण्यात आले. तुला नोकरी मिळवून देतो, असे सांगून तिला देवळीकडे जाणाऱ्या एका फार्म हाऊसवर नेण्यात आले. तेथे सहा जणांनी या तरुणीवर बलात्कार केला. या घटनेची माहिती सावंगी पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार; सावंगी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून या घटनेतील सहाही नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.


हेही वाचा – Corona: पुण्यात बाधितांचा आकडा २० हजारांवर; ६९३ रूग्णांचा मृत्यू