घरमहाराष्ट्रCorona: पुण्यात बाधितांचा आकडा २० हजारांवर; ६९३ रूग्णांचा मृत्यू

Corona: पुण्यात बाधितांचा आकडा २० हजारांवर; ६९३ रूग्णांचा मृत्यू

Subscribe

पुण्यात आत्तापर्यंत ६९३ कोरोना बाधितांचा मृत्यू

राज्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच राज्यातील महत्वाच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद शहरामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा देखील वाढताना दिसत आहे. पुण्यात एका रात्रीत २४० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

एकूण ११ हजार ९४२ कोरोनाचे रुग्ण बरे

एका रात्रीत कोरोनाचे २४० नवे रूग्ण आढळल्याने पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २० हजार २६३ वर पोहोचली आहे. तर आत्तापर्यंत ६९३ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात एकूण ११ हजार ९४२ कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

- Advertisement -

पुण्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता स्थानिक प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. दरम्यान राज्य सरकारकडून मास्क वापरण्याबाबत देखील कठोर पावलं उचलली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. पुणे सारख्या इतर शहरांमध्ये मास्क न वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मास्क न घातला बाहेर पडल्यास ५०० ते १००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

राज्यातील मृत्यूदर ४.५७ टक्के एवढा

दरम्यान शनिवारी राज्यात ५ हजार ३१८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात १६७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी ८६ मृत्यू हे मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८१ मागिल कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.५७ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ८४ हजार २४५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

- Advertisement -

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.९४ % एवढे आहे.आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ८,९६,८७४ नमुन्यांपैकी १,५९,१३३ (१७.७४ टक्के) नमनुे पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,६५,१६१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३६,९२५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात ५३१८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णाांची एकूण संख्या १,५९,१३३ झाली आहे.


देशात कोरोनाचा कहर; एका दिवसात ४१० जणांचा बळी, १९ हजारांहून अधिकांना संसर्ग
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -