घरताज्या घडामोडीराज्यात पोलीस बदल्यांना सहाव्यांदा मुदतवाढ; २ वरिष्ठ IPS अधकाऱ्यांच्या बदल्या!

राज्यात पोलीस बदल्यांना सहाव्यांदा मुदतवाढ; २ वरिष्ठ IPS अधकाऱ्यांच्या बदल्या!

Subscribe

राज्यात होणाऱ्या पोलिसांच्या बदल्यांविरोधात विरोधकांनी रान उठवल्यानंतर देखील राज्य सरकारने या बदल्या करणं सुरूच ठेवलं आहे. इतकंच नाही, तर या बदल्या करण्यासाठी एकापाठोपाठ मुदतवाढ दिल्या जात आहेत. त्यामुळे गेल्या ३ महिन्यांपासून राज्यात सातत्याने अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर हे बदल्यांचं सत्र नक्की कधी थांबणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्य सरकारने बदल्यांसाठी दिलेली याआधीची मुदतवाढ ३० सप्टेंबर म्हणजेच बुधवारी संपत होती. त्यामुळे बुधवारी रात्री राज्य सरकारने ही मुदत पुन्हा एकदा वाढवून आता १५ ऑक्टोबर केली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत तब्बल सहाव्यांदा बदल्यांना ही मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भातला जीआर अर्थात शासन निर्णय राज्य सरकारकडून बुधवारी रात्री जारी करण्यात आला आहे.

‘शासन निर्णयानुसार कोविड-१९ या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर २०२०-२१ या आर्थिक वर्षात राज्यातील पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत दिलेली मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात येत आहे’, असं या जीआरमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

२ महिन्यांत ६ वेळा मुदतवाढ!

पहिली मुदतवाढ – ३१ जुलै २०२०
दुसरी मुदतवाढ – १० ऑगस्ट २०२०
तिसरी मुदतवाढ – १५ ऑगस्ट २०२०
चौथी मुदतवाढ – ५ सप्टेंबर २०२०
पाचवी मुदतवाढ – ३० सप्टेंबर २०२०
सहावी मुदतवाढ – १५ ऑक्टोबर २०२०

२ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या!

बदल्यांना मुदतवाढ देताच राज्य सरकारने दोन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत.

- Advertisement -

१. बी. जी. शेखर यांची राज्य राखीव पोलीस बलाच्या पोलीस उपमहानिरीक्षक पदावरून नवी मुंबईच्या गुन्हे विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.

२. संजय शिंदे यांची पुण्याच्या अपर पोलीस आयुक्त पदावरून पुण्याच्या दक्षिण प्रादेशिक विभागाच्या अपर पोलीस आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.

३. भाग्यश्री नवटके यांची पुण्याच्या आर्थिक गुन्हे विभागाच्या पोलीस उपायुक्त पदी बदली करण्यात आली आहे.

४. सुरेश मेंगडे यांची नवी मुंबई झोन एकचे पोलीस उपायुक्त म्हणून बदली

५. अक्षय शिंदे यांची नागपूरचे पोलीस उपायुक्त म्हणून बदली

६. मंगेश शिंदे यांची पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी बदली

७. दीपक साकोरे यांची नागपूर मानवी हक्क संरक्षण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी बदली

८. संजय जाधव यांची राज्य महामार्ग पोलीस अधीक्षकपदी बदली


याआधी झालेल्या बदल्या – ४२ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या! वादग्रस्त अमिताभ गुप्ता पुण्याचे पोलीस आयुक्त!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -