घरदिवाळी 2022लक्ष्मी पूजन कसे करावे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि विधी

लक्ष्मी पूजन कसे करावे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि विधी

Subscribe

हिंदू धर्मात सर्व सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. दसरा झाला की सगळ्यांचे लक्ष दिवाळीकडे असते. दिवाळी भारतीयांचा सर्वात आवडता सण समजला जातो. यंदा 24 ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी केली जाईल. या वर्षी नरक चतुदर्शी आणि दिवाळी म्हणजेच लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असणार आहे. प्रत्येक वर्षी दिवाळीच्या दोन दिवस आधी धनत्रयोदशी साजरी केली जाते, तर दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली जाते आणि तिसऱ्या दिवशी दिवाळी मात्र यंदा नरक चतुदर्शी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असणार आहे. त्यामुळे या दिवशी विशेष योग असणार आहेत.

पौराणिक परंपरेनुसार, दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि श्री गणेशांची पूजा केली जाते. असं म्हणतात की, दिवाळीच्याच दिवशी श्रीराम 14 वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येला परत आले होते. त्यामुळे अयोध्येतल्या नागरिकांनी आनंद साजरा केला होतो. मात्र या दिवशी अश्विन अमावस्या असल्याने रात्री सगळीकडे अंधार होता. त्यामुळे अयोध्येतल्या लोकांनी मातीचे दिवे लावून सर्व अयोध्या प्रकाशमय करत श्रीरामांचे स्वागत केले. तेव्हापासून हा सण प्रत्येक वर्षी साजरा केला जातो. अनेकजण लक्ष्मीपूजन करण्यासाठी बाजारातून देवी लक्ष्मीचा नवीन फोटो किंवा मूर्ती घेऊन येतात. मात्र, फोटो घेताना विशेष लक्ष द्यादला हवे.

- Advertisement -

दिवाळी 2022 तिथी

कार्तिक अमावस्या तिथी प्रारंभ : 24 ऑक्टोबर 2022, संध्याकाळी 5.27 ते
कार्तिक अमावस्या तिथी समाप्त : 25 ऑक्टोबर 2022, संध्याकाळी 4.18 पर्यंत

- Advertisement -

लक्ष्मी पूजन शुभ मुहूर्त
संध्याकाळी, 05:29 ते 07:18 पर्यंत
रात्री, 10:29 ते 12:05 पर्यंत

लक्ष्मी पूजन कसे करावे?

  • सर्वप्रथम पूजा करण्यापूर्वी संपूर्ण घर स्वच्छ करावे.
  • घरातील पूजेच्या ठिकाणी एक चौरंग किंवा पाट ठेवून त्यावर लाल वस्त्र अंथरुन ठेवावे.
  • त्यावर देवी लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ति स्थापन करावी.
  • त्यांची विधीवत पूजा करावी.
  • मूर्तीला कुंकू, हळद, अक्षता, फुलं, मिठाई, धूप आणि दीप अर्पित करावे.
  • देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा. त्यानंतर त्यांची आरती करावी.

हेही वाचा :

लक्ष्मीपूजन करताना देवी लक्ष्मीची कशा प्रकारची मूर्ती वापरावी? जाणून घ्या शास्त्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -