घरताज्या घडामोडीचंद्रपुरच्या बल्लारशाह रेल्वे स्थानकातील पूल कोसळला; एकाचा मृत्यू, 20 जण जखमी

चंद्रपुरच्या बल्लारशाह रेल्वे स्थानकातील पूल कोसळला; एकाचा मृत्यू, 20 जण जखमी

Subscribe

महाराष्ट्रातील चंद्रपूरमधील बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील फूट ओव्हर ब्रिज (एफओबी)चा काही भाग कोसळल्याने रविवारी मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत शिक्षिका असलेल्या 48 वर्षीय नीलिमा रंगारी यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील चंद्रपूरमधील बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील फूट ओव्हर ब्रिज (एफओबी)चा काही भाग कोसळल्याने रविवारी मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत शिक्षिका असलेल्या 48 वर्षीय नीलिमा रंगारी यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. तसेच, सुमारे 20 जण जखमी झाले आहेत. हे सर्वजण फूट ओव्हर ब्रिजवरून चालत असताना सुमारे 60 फूट उंचीवरून पुलावरून रुळावर पडले.

जखमींपैकी 8 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी अनेक प्रवासी रूळ ओलांडत होते. हा फूटओव्हर ब्रिज प्लॅटफॉर्म एक आणि चारला जोडतो.

- Advertisement -

ही दुर्घटना घडली तेव्हा काझीपेट-पुणे एक्स्प्रेस पकडण्यासाठी अनेक प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर जात होते. अचानक पुलाच्या मध्यभागाचा स्लॅब कोसळला. यामुळे तेथून जाणारे प्रवासी थेट रुळावर पडले. जखमी प्रवाशांना लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात साची नीलेश पाटील, प्रेम तितरे, चैतन्य मनोज भगत, निधी मनोज भगत, छाया मनोज भगत, नयन बाबाराव भीवनवार, राधेश्याम सिंग, अनुराग खरतड, रिया खरतड, स्विटी खरतड, विक्की जयंत भीमलवार, पूजा सोनटक्के, ओम सोनटक्के जखमी झाले आहेत.

- Advertisement -

या घटनेत गंभीर जखमी झालेल्यांना एक लाख तर किरकोळ जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत रेल्वे विभागाकडून केली जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या घटनेची तातडीने दखल घेत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश दिले. जखमींना आवश्यक सुविधा पुरवण्यात याव्या, अशी सूचना मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाला केली. शासन स्तरावरून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिले आहेत.


हेही वाचा – उद्योगधंद्यावर आमचं धोतरही बोललं.., नक्कल करत राज ठाकरेंची राज्यपालांवर टीका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -