घरमहाराष्ट्रहोळीला चाकरमान्यांसाठी 20 स्पेशल ट्रेन

होळीला चाकरमान्यांसाठी 20 स्पेशल ट्रेन

Subscribe

एलटीटी,पनवेल ते करमाली ट्रेन

होळीसणाकरिता कोकणात भाविक आणि पर्यटकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनातर्फे २० स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहेत. एलटीटी,पनवेलहून करमाळीकरिता या ट्रेन धावणार आहेत.परिणामी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ०१०३९ एलटीटी-करमाली स्पेशल ट्रेन ६ ते २७ मार्च दरम्यान दर शुक्रवारी रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी सुटणार असून दुसर्‍या दिवशी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी करमाळीला पोहोचणार आहे.

परतीच्या प्रवासाकरिता ०१०४० ट्रेन ८ ते २९ मार्च दरम्यान दर रविवारी दुपारी १ वाजता निघून एलटीटीला रात्री १२ वाजून २० मिनिटांनी येणार आहे. या ट्रेनला ठाणे,पनवेल,रोहा,माणगाव,खेड,चिपळूण,संगमेश्वर, रत्नागिरी,वैभववाडी,कणकवली,सिंधुदुर्ग,कुडाळ ,सावंतवाडी आणि थिविम स्थानकात थांबा दिला आहे.

- Advertisement -

०१०४१ पनवेल-करमाळी स्पेशल ट्रेन ७ ते २८ मार्च दरम्यान दर शनिवारी रात्री ९ वाजता सुटणार असून दुसर्‍या दिवशी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी करमाळीला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासाकरिता ०१०४२ ट्रेन ७ ते २८ मार्च दरम्यान दर शनिवारी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी निघून पनवेलला त्याच रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी येणार आहे. या ट्रेनला थिविम, सावंतवाडी,कुडाळ,सिंधुदुर्ग,कणकवली,वैभववाडी,रत्नागिरी,संगमेश्वर,चिपळूण,खेड,माणगाव आणि रोहा स्थानकात थांबा दिला आहे.

०१०४३ एलटीटी-करमाली स्पेशल ट्रेन २१ फेब्रुवारी आणि ६ मार्च रोजी रात्री १ वाजून १० मिनिटांनी सुटणार असून दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी करमालीला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासाकरिता ०१०४४ ट्रेन २१ फेब्रुवारी आणि ६ मार्च रोजी दुपारी १ वाजता निघून एलटीटीला रात्री १२ वाजून २० मिनिटांनी येणार आहे. या ट्रेनला ठाणे,पनवेल,रोहा,माणगाव,खेड,चिपळूण,संगमेश्वर, रत्नागिरी,वैभववाडी,कणकवली,सिंधुदुर्ग,कुडाळ ,सावंतवाडी आणि थिविम स्थानकात थांबा दिला आहे. या तिन्ही स्पेशल ट्रेनला या ट्रेनला एसी टु टायरचा एक, एसी थ्री टायरचे ४,स्लीपर क्लासचे १२ आणि जनरल सेकण्ड क्लासचे ३ कोच असणार आहेत. प्रवासी या स्पेशल ट्रेनचे आरक्षण १४ फेब्रुवारीपासून करू शकतात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -