घरमहाराष्ट्रनाशिकलष्कराच्या ६३ जागांच्या भरतीसाठी २० हजार तरुण दाखल

लष्कराच्या ६३ जागांच्या भरतीसाठी २० हजार तरुण दाखल

Subscribe

लष्कराच्या ६३ जागांच्या भरतीसाठी २० हजार तरुण दाखल असून नेहमीप्रमाणे लष्कराच्या भरतीवेळी व्यवस्था न केल्याने एकच गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे.

सैन्य दलातल्या भरतीसाठी मोठ्या संख्येने तरुण दाखल झाले असून अवघ्या ६३ जागांसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून जवळपास २० हजार तरुण आले आहेत. हे सर्व तरुण देवळाली कॅम्पमध्ये दाखल झाले असून याठिकाणी नेहमीप्रमाणे कोणतीही व्यवस्था नसल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. भरतीसाठी येणाऱ्या तरुणांच्या झोपण्याची देखील सोय केली नसल्याने त्यांना रस्त्यावरच रात्र काढावी लागल्यामुळे अखेर पहाटेपासूनच भरती प्रक्रियेसाठी प्राथमिक चाचणी सुरु करावी लागली आहे.

रस्त्यावरच पेटवल्या चुली

लष्कराच्या भरतीसाठी यंदा ६३ जागांसाठी भरती प्रक्रिया होत असून त्यासाठीची चाचणी आजपासून सुरु झाली असून देवळाली कॅम्प, संसरी गावाच्या रस्त्यावर रात्रीपासूनच तरुणांचे लोंढे यायला लागले आहेत. नेहमीप्रमाणे यंदाही या ठिकाणी येणाऱ्या तरुणांसाठी जेवणाची तसेच राहण्याची व्यवस्था नसल्याने तरुणांने रस्त्यावर चुली पेटवल्या आहेत.

- Advertisement -

तरुणांची गर्दी वाढल्याने देवळाली कॅम्प परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, ही परिस्थिती नियंत्रणात न आल्याने अखेर अधिकाऱ्यांनी काठी उगारली. त्यामुळे एकच गोंधळ झाला आणि सर्व तरुण पळू लागले. त्यानंतर हजारो तरुणांची गर्दी पाहून अखेरीस पहाटे चार वाजता भरतीसाठी प्राथमिक चाचणी सुरु करण्यात आली आहे.


हेही वाचा – आता सोने खरेदीची पावती नसेल, तर भरावा लागणार जबरदस्त कर!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -