घरताज्या घडामोडीनगर रुग्णालय आग प्रकरण: राज्यातील रुग्णालयांच्या फायर सेफ्टी ऑडिटसाठी २१७ कोटी देण्यात...

नगर रुग्णालय आग प्रकरण: राज्यातील रुग्णालयांच्या फायर सेफ्टी ऑडिटसाठी २१७ कोटी देण्यात येणार

Subscribe

नगरमधील जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीनंतर राज्यातील रुग्णालयांचे फायर सेफ्टी ऑडिट करण्यासाठी तातडीने २१७ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यात अग्निसुरक्षा अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

राज्यात रुग्णालयांना वारंवार लागणाऱ्या आगींची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. नगरमधील रुग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सकृतदर्शनी दिसून येत असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात सांगितले. प्रत्येक जिल्ह्यातील अग्निसुरक्षा अधिकारी जिल्हा, तालुका आणि ग्रामीण पातळीवरील रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा यंत्रणांचा आढावा घेतील. प्रत्येक जिल्ह्यात अग्निसुरक्षा अधिकारी नियुक्त केला जाईल, असेही टोपे म्हणाले.

- Advertisement -

आगीच्या या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात अग्निसुरक्षा अधिकारी हे पद निर्माण केले जाईल. हा अधिकारी अग्नि सुरक्षा प्रतिबंधक उपाययोजनांवर लक्ष ठेवण्याचे काम करील.नगरमधील आगीच्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीला आठ दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना  दिल्याचेही त्यांनी सांगितले.


हेही वाचा – सिंधूदुर्गातील रेडकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या कोरोनावरील ‘मिथिलीन ब्यू’ औषधास मान्यता

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -