Corona In Maharashtra : राज्यात २२,०८४ नवे रुग्ण; तर ३९१ जणांचा मृत्यू

8,151 new COVID-19 cases reported in Maharashtra today

राज्यात २२,०८४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या १०,३७,७६५ झाली आहे. राज्यात २,७९,७६८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३९१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या २९ हजार ११५ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.८१ टक्के एवढा आहे.

राज्यात ३९१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४२, ठाणे ६, नवी मुंबई मनपा ७, कल्याण डोंबिवली मनपा १, मीरा भाईंदर मनपा १, पालघर ४, रायगड ९, नाशिक १०, अहमदनगर १७, धुळे ५, जळगाव ७, पुणे ४५, पिंपरी चिंचवड मनपा १६, सोलापूर २२, सातारा १८, कोल्हापूर २३, सांगली ३१, औरंगाबाद १२, लातूर ५, उस्मानाबाद ४, नांदेड १६, नागपूर ४०, अन्य ३ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ३९१ मृत्यूंपैकी २८० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४१ मृत्यू अहमदनगर १०, कोल्हापूर ७, औरंगाबाद ६, पुणे ६, सातारा ५, बीड १, गोंदिया १, जळगाव १, नाशिक १, उस्मानाबाद १, पालघर १ आणि सांगली १ असे आहेत. आज १३,४८९ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ७,२८,५१२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.२ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५१,६४,८४० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १०,३७,७६५ (२०.०९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १६,५२,९५५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३८,२७५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

हेही वाचा –

KEM Chaos : गुन्हेगाराला अटक न केल्यास संप पुकारणार; डॉक्टरांचा इशारा