Tuesday, May 30, 2023
27 C
Mumbai
घर नवी मुंबई 24 X 7 'अलर्ट नवी मुंबईकर' मिशन, पोलीस आयुक्त भारंबे ॲक्शन मोडमध्ये

24 X 7 ‘अलर्ट नवी मुंबईकर’ मिशन, पोलीस आयुक्त भारंबे ॲक्शन मोडमध्ये

Subscribe

नवी मुंबई : नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळावी, यासाठी ‘अलर्ट नवी मुंबईकर’ मिशन नवी मुंबई पोलिसांकडून राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत ‘डायल-112’ सुविधा सुरू केली आहे. आपत्कालीन प्रतिसाद सेवेची नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या वतीने वाशी येथील एक्झिबिशन सेंटरमध्ये ‘डायल-112 प्रमोशन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सारंगल यांनी ‘डायल 112’ वाहनांना झेंडा दाखवून या उपक्रमाचा शुभारंभ केला.

या कार्यक्रमाप्रसंगी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, संजय मोहिते (पोलीस सहआयुक्त), महेश घुर्ये, (अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे), प्रशांत मोहिते (पोलीस उपआयुक्त, विशेष शाखा), पंकज डहाणे (पोलीस उपआयुक्त, परिमंडळ 2), अमित काळे (पोलीस उपआयुक्त, गुन्हे शाखा), विवेक पानसरे (पोलीस उपआयुक्त, परिमंडळ 1), संजय कुमार पाटील (पोलीस उपआयुक्त, मुख्यालय, तिरूपती काकडे (पोलीस उपआयुक्त, वाहतूक शाखा) व डॉ. प्रिती टिपरे (पोलीस अधीक्षक, डायल 112) तसेच सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, इतर अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

- Advertisement -

नवी मुंबईतील नागरिकांमध्ये डायल 112 या नंबरविषयी प्रसार व जनजागृती व्हावी याकरीता 5 सुसज्ज वाहने, त्यावर डायल 112चे पोस्टर लावून सतत तीन दिवस नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत विविध भागांमध्ये (मुख्यत्वे करून ज्या ठिकाणी नागरिकांची जास्त वर्दळ असते अशा ठिकाणी) गस्त करणार आहेत. तर, प्रमुख ठिकाणी 41 हजार 500 पोस्टर्स लावून देखील जनजागृती करण्यात येईल. 24 तास 365 दिवस ही सेवा सुरू राहणार आहे.

पोलीस आयुक्त भारंबे ॲक्शन मोडमध्ये
मागील वर्षभरात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात सर्वच गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याची कबुली पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी वार्षिक अहवाल सादर करताना दिली होती. वाढत्या घटनांना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा जागी झाली असून पोलीस आयुक्त भारंबे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -