घरताज्या घडामोडीCoronavirus : २४ तासांत राज्यात २५३ पोलिसांना कोरोनाची बाधा; ५ जणांचा मृत्यू

Coronavirus : २४ तासांत राज्यात २५३ पोलिसांना कोरोनाची बाधा; ५ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात मागील २४ तासांमध्ये आणखी २५३ पोलीस कोरोनाबाधित झाले आहेत. तर पाच पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे अनलॉक प्रक्रिया सरु करण्यात आली आहे. या अनलॉकनंतर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक वाढल्याचे दिसून येत आहे. अनलॉकनंतर पोलीस विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या वाहनांवरील कारवाई दरम्यान, राज्यात पोलीस दलातील अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये आणखी २५३ पोलीस कोरोनाबाधित झाले आहेत. तर पाच पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. मात्र, तरी देखील कोरोनाच्या बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. सध्या राज्यात पोलिसांची एकूण संख्या २१ हजार ८२७ झाली असून सध्या ३ हजार ४३५ जण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत १८ हजार १५८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत २३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे.

- Advertisement -

राज्यातील २१ हजार ८२७ करोनाबाधित पोलिसांमध्ये २ हजार ३८१ अधिकारी आणि १९ हजार ४४६ कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या ३ हजार ४३५ पोलिसांमध्ये ४४० अधिकारी आणि २ हजार ९९५ कर्मचारी आहेत. तर कोरोनामुक्त झालेल्या १८ हजार १५८ पोलिसांमध्ये १ हजार ९१८ अधिकारी आणि १६ हजार २४० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या २३४ पोलिसांमध्ये २३ अधिकारी आणि २११ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.


हेही वाचा – खुशखबर: शनिवारपासून दररोज धावणार ‘दादर-सावंतवाडी’ विशेष ट्रेन


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -