घरताज्या घडामोडीएकनाथ कुठे आहे?, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पवारांना प्रत्युत्तर

एकनाथ कुठे आहे?, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पवारांना प्रत्युत्तर

Subscribe

महाराष्ट्राच्या इतिहासात एकाही तालुक्यात दुष्काळ पडलेला नाही. निसर्गाने आमच्या सरकारला आशीर्वाद दिला आहे. आज विरोधी पक्षांनी देखील त्यांच्या पत्रकार परिषदेत बरेचसे मुद्दे उपस्थित केले आहे. बहिष्काराचे पत्र देखील देण्यात आले आहे. आमचं सरकार येऊन दीड महिना पूर्ण झाला आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना एकनाथ कुठे आहे असा टोला लगावला त्यावर मुख्यमंत्र्यांनी मी माझ्या जाग्यावर आहे, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पत्रकार परिषदेतून दिलं आहे.

आम्हाला सात पानी पत्र दिलं आहे. मला वाटलं हा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे की काय?, अजित पवारांनी म्हटलं की, आम्ही ७५० निर्णय घेतले. धर्मवीर चित्रपटाचा उल्लेख करत ते म्हणाले की, एकनाथ कुठे आहे?, मी माझ्या जागेवरच आहे. निर्णय घ्यायला खंबीरपणे उभं राहावं लागतं, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

दीड महिन्यामध्ये आम्ही जे काही निर्णय घेतले. ते निर्णय घेण्यासाठी खंबीरपणे उभे राहावे लागते. त्यामुळे ते निर्णय देखी आपल्या सर्वांना माहिती आहेत. आमचं सरकार एका भूमिकेतून, बाळासाहेबांच्या भूमिकेतून त्यांच्या विचाराचं सरकार आम्ही स्थापन केलं आहे. आमची भूमिका जनतेला पटली नसती तर आज राज्यभरात आमचं, आमदारांचं आणि खासदारांचं जे स्वागत होत आहे ते झालं असतं का? सर्वसामान्यांचं सरकार आहे ही, भावना जनतेच्या मनात तयार झाली आहे. अजित पवारांना त्रास होणं स्वाभाविक आहे, कारण ते सरकार तर तेच चालवत होते ना, असा टोलाही एकनाथ शिंदेंनी पवारांना लगावला आहे.

शेतकऱ्यांना ५० हजार मदतीचा आम्ही निर्णय घेतला होता. पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती. अतिवृष्टी भागात जे काही नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. ज्यावेळेस अतिवृष्टी झाली,त्यावेळी आम्ही गडचिरोलीला देखील गेलो होतो. भरपूर पाऊस पडत होता. त्या परिस्थितीत आम्ही त्यांना मदत केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे पाहणी करायला गेले नाहीत, हा त्यांचा मुद्दा होता. आम्ही फिल्डवर काम करणारे लोकं आहोत. शेतकऱ्यांसाठी जे काही आपल्याला करायचं आहे, ते आपण करणार आहोत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : ‘हे’ पत्र देताना विरोधी पक्षाला काही गोष्टींची विस्मृती झाली, देवेंद्र फडणवीसांचा पलटवार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -