महाराष्ट्रात 24 तासांत 336 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 5 रुग्णांचा मृत्यू

CORONA PESHANT

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मागील 24 तासांत राज्यात 336 इतक्या नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82% एवढा आहे.

गेल्या 24 तासांत 574 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानं राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 79,73,154 जण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.15 टक्के इतके झाले आहे.

काल गुरूवारी राज्यात 198 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर, एकाचा मृत्यू झाला होता. परंतु आज 336 इतक्या नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून संख्या दुप्पट झालेली आढळून येत आहे.

मुंबईतील परिस्थिती काय?

मुंबईत 24 तासांत 132 इतक्या नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्ण संख्या 1,151,040 इतका आहे. तसेच बेडवरील रुग्णांची संख्या 1 आहे. तर प्रगतीपर अहवालानुसार 7 आहे. रुग्णालयात दाखल केलेल्या एकूण रूग्णांची संख्या 18.480 इतकी आहे. कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 115 इतकी आहे.

देशातील परिस्थिती पाहिली असता, देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 997 रुग्ण आढळले आहेत. तर, 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात गुरुवारी 2 हजार 500 नव्या रुग्णांची नोंद झाली होती.


हेही वाचा : फोन टॅपिंगप्रकरणी रश्मी शुक्लांना क्लीनचिट? न्यायालयात पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट