घरमहाराष्ट्रअमळनेरात ३५ लाखांचा गुटखा जप्त

अमळनेरात ३५ लाखांचा गुटखा जप्त

Subscribe

जळगाव येथे अमळनेर तालुक्यात धडक कारवाई करत ३५ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

गुटख्यावर बंदी असताना देखील शहरात गुटख्याची सर्रास विक्री केली जाते. मोठ्या प्रमाणात गुटखा बाजारात विकला जातो. अशीच गुटख्याची विक्री करणाऱ्या ठोक विक्रेत्यांवर जळगावमध्ये अन्न व औषधी प्रशासनाकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. जळगाव तालुका अमळनेर शहरातील सिंधी कॉलनी आणि इतर भागात विक्री करणाऱ्यांवर छापा टाकण्यात आला. आज जळगाव पोलिसांच्या विशेष पथकाने केलेल्या धडक कारवाईत गुटखा विक्री करणाऱ्यांवर छापा मारुन ३५  लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. अमळनेर शहरातील सिधी कॉलनीत आणि शहराच्या इतर भागात मोठया प्रमाणात गुटख्याचा साठा असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक दत्ता शिंदे यांना मिळाली होती. या मिळालेल्या माहितीच्या आधारे एल. सी. बी टीमला आदेश देऊन रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली.

लाखोंचा गुटखा जप्त

अमळनेर शहरातील सिंधी कॉलनी, चोपडा रोडवरील श्याम वासवानी यांच्याकडून आणि शहरातील बठेजा, गोकुळ पाटील यांच्याकडून पोलिसांच्या विशेष पथकाने गुटख्याची विक्री करणाऱ्यांवर छापा टाकण्यात आली. या कारवाईत ३५  लाख रुपयांचा विमल गुटखा जप्त करण्यात आला आहे. जळगाव आरसीपीचे पथकांने ही धडक कारवाई केली आहे. मात्र या बाबत याबाबत अजून कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. अजूनही गुटखा मोजणीचे काम सुरू असून मोजणी झाल्यानंतर संपूर्ण माहिती देण्यात येईल असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

वाचा – पिंपरीत-चिंचवडमध्ये टेम्पोसह १० लाख रुपयांचा गुटखा जप्त

वाचा – औरंगाबादमध्ये १४ लाखांचा गुटखा जप्त

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -