घरफोटोगॅलरीकॅन्सरग्रस्त चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर ऐश्वर्याने फुलवले हास्य!

कॅन्सरग्रस्त चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर ऐश्वर्याने फुलवले हास्य!

Subscribe

प्रख्यात अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन यांनी कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (सीपीएए)ने आयोजित केलेल्या ‘ख्रिसमस कार्निव्हल धमाका’ या विशेष कार्यक्रमात ३०० कॅन्सरग्रस्त मुलांसोबत आपला काही वेळ घालवून त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले. कार्निव्हलमध्ये सहभागी झालेल्या मुलांनी या प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला. ख्रिसमसनिमित्त २३ डिसेंबर २०१८ रोजी मुंबईतील वडाळा येथील आयमॅक्स चित्रपटगृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात खेळ, टॅटू बनविणे, केक बनविणे, मेहंदी काढणे यांसारखे उपक्रम मुलांसाठी राबविण्यात आले होते. या आयोजनातून भरपूर धमाल आणि गंमत या मुलांनी केली. यावेळी मुलांना सीपीएएतर्फे मोठ्या प्रमाणावर भेटवस्तू आणि खाद्यपदार्थ वाटले गेले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -