घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रवर्षभरात शिर्डी साईबाबा संस्थानला ४०० कोटींची देणगी; कसे आहे देणगीचे स्वरूप...

वर्षभरात शिर्डी साईबाबा संस्थानला ४०० कोटींची देणगी; कसे आहे देणगीचे स्वरूप…

Subscribe

नाशिक : देशातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी देवस्थानाला २०२२ या वर्षात भाविकांनी भरघोस दान दिले आहे. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारी नुसार यंदाच्या वर्षी साई बाबांच्या भक्तांनी देवस्थानाला ३९४ कोटी २८ लाख ३६ हजार रुपयांची देणगी दिली आहे. १ जानेवारी ते २६ डिसेंबर २०२२ या कालावधीत ही देणगी प्राप्त झाली आहे. नाताळच्या सुट्ट्या आणि नववर्षाचे स्वागत या निमित्ताने दरवर्षी शिर्डीत साई बाबांच्या दर्शनासाठी लाखो भाविक गर्दी करत असतात. त्यामुळे ३१ डिसेंबर पर्यंत देणगीचा आकडा ४०० कोटींचा टप्पाही पार करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दक्षिणा पेटीच्या माध्यमातून १६६ कोटी, देणगीसाठी उभारलेल्या काऊंटरच्या माध्यमातून ६६ कोटी अशी रोख रक्कम तर २५ किलो सोने आणि ३२६ ग्राम चांदी अशी वस्तूंच्या स्वरुपात ही देणगी शिर्डी संस्थानला प्राप्त झाली आहे. भाविकांकडून मिळालेल्या या देणगीच्या माध्यमातून संस्थान विविध समाजोपयोगी काम करत असते. शिर्डी साई संस्थानचे साईनाथ रूग्णालयात निशुल्क तर साईबाबा रूग्णालयात माफक दरात वैद्यकीय उपचार केले जातात. मोठ्या आजारांसाठी तसेच गोरगरीब रूग्णांना वैद्यकीय अनुदान देण्यात येते. प्रसादालयात भाविकांना मोफत अन्नदान करण्यात येते. वर्षाकाठी जवळपास दीड कोटी भाविक या प्रसादाचा लाभ घेतात. संस्थानच्या माध्यमातून शिक्षणासाठीही काम केले जाते. शैक्षणिक संकुलात सहा हजार विद्यार्थी नाममात्र दरात शिक्षण घेत आहेत. त्याचसोबत भाविकांना माफक दरात निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. राष्ट्रीय व नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर संस्थान आर्थिक मदत करते. संस्थानात जवळपास सहा हजार कर्मचारी आहेत. अशी माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -