घरमहाराष्ट्रमुंबईमध्ये करोनाचे 441 नवे रुग्ण

मुंबईमध्ये करोनाचे 441 नवे रुग्ण

Subscribe

बाधितांची संख्या 8613 वर, करोनाबाधित 21 रुग्णांचा मृत्यू

मुंबईत रविवारी 441 नवे रुग्ण सापडल्याने करोनाबाधितांची संख्या 8613 वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे 21 जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 343 वर पोहचला आहे.

मुंबईतील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ रविवारीही कायम राहिली. मुंबईमध्ये 441 करोनाचे नवे रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील करोनाबाधितांची संख्या 8613 वर पोहचली आहे. 30 एप्रिल आणि 1 मेदरम्यान प्रयोगशाळांमध्ये केलेल्या 60 जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल रविवारी आल्याने त्याचाही यात समावेश केला आहे.

- Advertisement -

मुंबईमध्ये 21 जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 343 वर पोचली आहे. मृत्यू झालेल्या 21 जणांमध्ये 10 जण हे दीर्घकाळ आजारी होते. तर 7 जणांचा वार्धक्याने मृत्यू झाला आहे. यामध्ये 12 पुरुष तर 9 महिलांचा समावेश आहे. मृतांमधील 11 जण हे 60 वर्षांवरील, 9 जण हे 40 ते 60 च्या दरम्यान तर एकाचे वय 40 वर्ष होते.

मुंबईत करोनाचे 469 संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित करोना रुग्णांची संख्या 11 हजार 464 वर पोहचली आहे. तसेच 100 रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल 1804 जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -