घरताज्या घडामोडीMaharashtra Corona: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ५ लाख बालके संक्रमित होण्याची शक्यता -...

Maharashtra Corona: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ५ लाख बालके संक्रमित होण्याची शक्यता – डॉ. राजेंद्र शिंगणे

Subscribe

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट हळूहळू मंदावत असतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली गेली आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर राज्य सरकार उपायोजना करण्याच्या तयारीत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव लहान मुलांवर होणार आहे. राज्यातील सुमारे ५ लाख बालके तिसऱ्या लाटेत संक्रमित होण्याची शक्यता आहे, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

डॉ. राजेंद्र शिंगणे काय म्हणाले?

‘राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ५० लाख लोकं संक्रमित होण्याचा अंदाज आहे. तर ८ लाख सक्रीय रुग्णांची संख्या राहणार आहे. कोरोनाची तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर सर्वाधिक प्रभावी होण्याची चर्चा आपण ऐकत आहोत. त्यामुळे अंदाजानुसार तिसऱ्या लाटेत ५ लाख बालके संक्रमित होण्याची शक्यता आहे. जवळपास अडीच टक्के बालके शासकीय सुविधेत दाखल होतील. साडे तीन टक्के बालकांना रुग्णालयात दाखल होण्याची व बालरोग तज्ज्ञ आहेत, त्यांचा उपचार करण्याची गरज त्याठिकाणी पडेल, अशी चिंता अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात सध्या डेल्टा प्लस व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीत बदल केला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील सर्व जिल्हे तिसऱ्या टप्प्यात असणार आहेत. सोमवारपासून सर्व जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील नियम लागू होणार आहेत.


हेही वाचा – Maharashtra Lockdown: डेल्टा प्लसमुळे राज्यातील सोमवारपासून सर्व जिल्हे तिसऱ्या गटात

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -