खुशखबर! आजपासून महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत

50 Percent Discount on ST Ticket for women |

50 Percent Discount on ST Ticket for women | मुंबई – महाराष्ट्र राज्याच्या सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये (Maharashtra Assembly Budget 2023) महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने १७ मार्चपासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर महिला सन्मान योजना (Mahila Sanman Yojana) म्हणून ओळखले जाईल. या योजनेची प्रतिपूर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणार आहे.

राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना ३३ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त राज्य शासनाने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच ६५ ते ७५ वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते. या सवलतीची प्रतिपूर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला प्राप्त होत आहे.

५० टक्के सवलत मिळाल्याने ग्रामीण भागातील गरीब महिलांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. शाळकरी विद्यार्थ्यांनीनाही याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या योजनेमुळे महिलांना मोठ्याप्रमाणात दिलासा मिळाला आहे. ७५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठांना मोफत प्रवास सुरू करण्यात आला आहे. या मोफत प्रवास योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या दोन्ही योजनांचा नागरिकांना लाभ होत आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! ST प्रवासात महिलांना तिकीटदरात सरसकट ५० टक्के सूट