घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023मोठी बातमी! ST प्रवासात महिलांना तिकीटदरात सरसकट ५० टक्के सूट

मोठी बातमी! ST प्रवासात महिलांना तिकीटदरात सरसकट ५० टक्के सूट

Subscribe

Maharashtra Assembly Budget 2023 | महिलांना आता अवघ्या निम्म्या दरांत प्रवास करता येणार आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना वरदान ठरणार आहे. 

Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे अर्थसंकल्प सादर करत आहेत. हा अर्थसंकल्प सर्वांगीण असेल असं याआधीपासूनच सांगण्यात येत होते. कृषी क्षेत्रासाठी भरघोस मदत जाहीर केल्यानंतर महिलांसाठीही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत देण्यात येणार असल्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे महिलांना आता अवघ्या निम्म्या दरांत प्रवास करता येणार आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना वरदान ठरणार आहे.

महिलांसाठी आणखी योजना काय?

- Advertisement -
  • चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार
  • महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर
  • कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर
  • मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना
  • महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण
  • माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ

  • आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये
  • गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये
  • अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये
  • मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये
  • गणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये
  • अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार
  • अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली

लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची… ‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात

  • मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात
  • पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ
  • जन्मानंतर मुलीला 5000 रुपये
  • पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये
  • अकरावीत 8000 रुपये
  • मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये
- Advertisement -

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -