घरCORONA UPDATECoronavirus : कोरोना व्हायरस रोखण्यासाठी ७५ पोलिसांनी केले मुंडण

Coronavirus : कोरोना व्हायरस रोखण्यासाठी ७५ पोलिसांनी केले मुंडण

Subscribe

रविवारी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकासह ७५ पोलिसांनी सामूहिक मुंडण केले.

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी आग्रा येथील फतेपुर शिक्री पोलीस ठाण्यातील पोलिसांनी एक नामी शक्कल लढवली आहे. रविवारी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकासह ७५ पोलिसांनी सामूहिक मुंडण केले. त्यानंतर हे पोलीस शहरातील गस्तीसाठी रवाना झाले. लॉकडाऊन सुरू असताना नागरिकांनी घराच्या दरवाज्यातून आणि खिडक्यांमधून मुंडण केलेले पोलीस पाहिल्यावर सगळे आश्चर्यचकीत झाले होते.

कोरोनापासून संरक्षण व्हावे, यासाठी तोंडाला मास्क बांधतात. आणि डोके ही झाकतात हे आम्ही पाहिले आहे. म्हणजेच कोरोना विषाणू डोक्याच्या केसांनाही चिकटू शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले. तिथून तो श्वासावाटे शरीरात ही जाऊ शकतो. हे लक्षात घेऊन आम्ही मुंडण केले, असे फतेपुर शिक्री पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक भूपेंद्र सिंह बालियान यांनी सांगितले.

- Advertisement -
20200406_123324
कोरोना रोखण्यासाठी ७५ पोलिसांनी केले मुंडण

मुंडण करणाऱ्या पोलिसांमध्ये प्रभारी निरीक्षकाव्यतिरिक्त निरीक्षक (गुन्हे) अमित कुमार, नऊ उपनिरीक्षक, १५ मुख्य हवालदार आणि ४९ हवालदारांचा समावेश आहे. मुंडण करणे हे प्रोटोकॉलचे उल्लंघन नाही, असे पोलीस निरीक्षकांचे म्हणणे आहे. मोठे केस राखणे हे प्रोटोकॉलचे उल्लंघन आहे. परंतु, केस छोटे करणे आणि किंवा मुंडण करणे हा प्रोटोकॉलचा भंग कधीही नसतो, असेही पोलिसांचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -