घरताज्या घडामोडीनगर पंचायत निवडणुकीसाठी अंदाजे ७६ टक्के मतदान

नगर पंचायत निवडणुकीसाठी अंदाजे ७६ टक्के मतदान

Subscribe

प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील १०६ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक‍ निवडणुकीसाठी मंगळवारी सरासरी ७६ टक्के तर भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद तसेच त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ६९टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. याशिवाय महानगरपालिकांच्या तीन रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी ३८ टक्के आणि ग्रांमपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी ७३ टक्के मतदान झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या अनारक्षित केलेल्या जागा वगळून उर्वरित सर्व जागांसाठी आज मतदान घेण्यात आले. या निवडणुकीचा निकाल १९ जानेवारी २०२२ रोजी जाहीर होणार आहे.

 

- Advertisement -

मुरबाड आणि शहापूर दोन्ही नगरपंचायत  निवडणुकीसाठी  ७१.८३ टक्के मतदान

जिल्ह्यात आज मुरबाड आणि शहापूर या दोन्ही नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण ७१.८३ टक्के मतदान झाले. त्यामध्ये मुरबाड ६९.४ टक्के तर शहापूर मध्ये ७५.७३ टक्के मतदान झाले. मुरबाडमध्ये एकूण १७ पैकी १३ प्रभागांमध्ये निवडणूक झाली त्यासाठी १९ मतदान केंद्र होते. एकूण १२ हजार ८९७ पैकी ८९५१ मतदारांनी (६९.४ टक्के) मतदानाचा हक्क बजावला त्यात ७०.५२ टक्के महिला मतदारांनी तर ६८.४० टक्के पुरुष मतदारांनी मतदान केले.

शहापूरमध्ये एकूण १७ पैकी १३ प्रभागांमध्ये निवडणूक झाली त्यासाठी १४ मतदान केंद्र होते. एकूण ८ हजार ५८ पैकी ६१०२ मतदारांनी (७५.७३ टक्के) मतदानाचा हक्क बजावला त्यात ७५.४४ टक्के महिला मतदारांनी तर ७५.९८ टक्के पुरुष मतदारांनी मतदान केले.

- Advertisement -

हेही वाचा – Winter Assembly session: चहापानाला मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती, विरोधकांचाही बहिष्कार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -