घरक्राइमधक्कादायक! भांडुपमध्ये 9 वर्षांच्या मुलीवर अत्याचार; 62 व 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांना...

धक्कादायक! भांडुपमध्ये 9 वर्षांच्या मुलीवर अत्याचार; 62 व 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांना अटक

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील मुलींवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अशातच आज मुंबईतील भांडुप परिसरातील 9 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील मुलींवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अशातच आज मुंबईतील भांडुप परिसरातील 9 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी 2 ज्येष्ठ नागरिकांना अटक केली आहे. तसेच, एक आरोपी फरार असल्याचे समजते. (9 year old girl molested in Bhandup by 62 and 65 year old senior citizens arrested)

मिळालेल्या माहितीनुसार, 62 व 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांना अटक करण्यात आली आहे. या नागरिकांची नावे समजली नसून, पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणी ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, पोलिसांनी अधिक तपास केला असता पीडित मुलीवर मागील तीन वर्षांपासून अत्याचार सुरू असल्याचे समजते. तसेच, दोघांना पोलिसांनी अटक केली असून, एक आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

नेमके प्रकरण काय?

- Advertisement -

एका समाजिक संस्थेच्या महिला पदाधिकाऱ्याने 9 वर्षीय मुलीला पाहिले आणि तिला अनाथालयात दाखल केले. त्यानंतर तिथे 62 आणि 65 वर्षांचे हे आरोपी पोहचले आणि त्यांनी या मुलीचे संगोपन करीत असल्याचा दावा केला आहे. मात्र, या दोन्ही आरोपींची वागणूक संशयास्पद वाटत होती. त्यामुळे तिथल्या अनाथालयातील अधिकाऱ्याने या लहान मुलीला विश्वासात घेऊन त्यांच्याबाबत विचारणा केली. त्यानंतर त्या मुलीने तिच्यासोबत घडल्याचा सर्व प्रकार सांगितला. तिचे आई-वडील एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले आहे. ही लहानगी तिच्या आईच्या एका नातेवाईक महिलेकडे राहत होती. मुलीच्या आजीकडे घर नव्हते, त्यावेळी आरोपींपैकी एकाने त्यांना मदत केली. त्यानंतर या लहानगीवर अत्याचार करण्यास सुरुवात केली.

तुळजापूर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार हे अमानवी कृत्य आहे. या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी शिफारस महिला आयोग करणार आहे, अशी माहिती आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ही माहिती दिली.


हेही वाचा – अफगाणिस्तानातील हेरात मशीद परिसरात बॉम्बस्फोट; 14 जणांचा मृत्यू

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -