घरताज्या घडामोडीसिंधुदुर्गात भर समुद्रातील बोटीला भीषण आग

सिंधुदुर्गात भर समुद्रातील बोटीला भीषण आग

Subscribe

सिंधुदुर्गात मच्छीमारासाठी गेलेल्या बोटीला भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.

सिंधुदुर्गात मच्छीमारासाठी गेलेल्या बोटीला भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. आग लागल्यानंतर समुद्रातील इतर बोटीमधील नागरिकांनी या बोटीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. (A boat caught fire in the sea at Sindhudurg)

मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हद्दीतील एका मत्स्य व्यावसायिकाने मच्छीमारीसाठी समुद्रात बोट नेली होती. देवगडपासून जवळपास 18 वाव ही बोट आतमध्ये नेली होती. त्यावेळी या बोटीमध्ये अनेक मच्छीमारही होते. देवगड येथील हा मत्स्य व्यावसायिक होता.

- Advertisement -

मात्र, त्यावेळी भर समुद्रातच या बोटीला आग लागली. समुद्रात मासेमारी करत असताना अचानक या बोटीला आग लागली. आग लागल्याने समुद्रातील इतर मच्छीमार आपल्या बोटी तातडीने आग लागलेल्या बोटीच्या दिशेने घेऊन गेले.  अचानक बोटील लागलेली आग ही भीषण असल्यामुळे इतर मच्छीमारांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.

दरम्यान, या अचानक लागलेल्या आगीमुळे बोटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने बोटीतील मच्छीमारांना सुखरूप वाचवण्यात आल्याने जीवितहानी टळली. मात्र अद्याप या बोटीला आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही.

- Advertisement -

दरम्यान, नवी मुंबईतील उरणच्या करंजा धक्क्यावर नांगरून ठेवण्यात आलेल्या मच्छिमार बोटीला आग लागली होती. या आगीत संपूर्ण बोट जळून खाक झाली आहे. या आगीमुळे मच्छिमार बोटीचे ५० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज त्यावेळी वर्तवण्यात जात होता. बोटीवरील खलाशी बोटीत जेवण बनवत असताना स्टोव्हचा स्फोट होऊन ही आग लागली होती. आग लागली त्यावेळेस बोटीत ३ परप्रांतीय खलाशी होते. आग लागल्याचे समजताच इतर मच्छिमारांनी नांगर तोडून बोट खेचत किनाऱ्यावर आणली.आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सिडको, जेएनपीटी आणि ओनजीसीच्या अग्निशमन दलाच्या बंबानी आग विझविली.


हेही वाचा – Weather Update : पुढील तीन दिवस देशाच्या ‘या’ भागात थंडीचा जोर कायम राहणार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -