घरमहाराष्ट्रपिंपरी गोळीबार प्रकरणात ट्विस्ट; राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंच्या मुलावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी...

पिंपरी गोळीबार प्रकरणात ट्विस्ट; राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंच्या मुलावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा

Subscribe

पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे कथित गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. अण्णा बनसोडेंवर गोळीबार करणाऱ्या कंत्राटदार अँथोनी यांचा मॅनेजर तानाजी पवारने उलट तक्रार दाखल केली असून अण्णा बनसोडेंच्या मुलावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तर गोळीबार करणारा आरोपी तानाजी पवार याच्यासह तिघांवर आमदार आणि त्यांच्या मुलाला जीवे मारण्यासाठी गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

बुधवारी राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंवर गोळीबार झाला. हा गोळीबार कंत्राटदार अँथोनी यांचा मॅनेजर तानाजी पवारने केला. यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर आता तानाजी पवारने उलट तक्रार करत अण्णा बनसोडेंच्या मुलाने हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

- Advertisement -

काय आहे तक्रार?

पिंपरी चिंचवड महापालिकेचे कंत्राटदार सिजू अँथनी यांच्या कार्यालयात सिद्धार्थ बनसोडे ११ मे रोजी दुपारी घुसले होते. त्यानंतर दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. लोखंडी टॉमीसारख्या घातक शस्त्राने दोघांवर हल्ला केल्याचं सीसीटीव्हीत देखील कैद झालं आहे. अँथनी यांच्या कंपनीचे मॅनेजर तानाजी पवार कुठे आहेत? हे कर्मचाऱ्यांनी न सांगितल्याच्या रागातून आमदार पुत्र सिद्धार्थ आणि पीएसह दहा जणांनी हा जीवघेणा हल्ला केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. या प्रकरणी निगडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

आमदार आणि तानाजी पवार यांच्यातील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

आमदार बनसोडे आणि तानाजी पवार यांच्यामधील ११ मे रोजी फोनवरुन झालेल्या संवादाची क्लिप समोर आली. यात आमदार शिवीगाळ करुन तानाजीला धमकावत असल्याचं कळतंय. तानाजी मात्र आपण योग्य भाषा वापरावी, असं अनेकदा सांगत होता. परंतु संतापलेल्या आमदारांनी तू उद्या ये मग बघू, असं त्यात धमकावलं.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -