वडील करोनाग्रस्त असल्याने मुलांना प्रवेश नाकारला

नागपूरमध्ये एका व्यक्तीला करोनाची लागण झाली असून त्यांच्या मुलांना शाळा आणि महाविद्यालय प्रशासनाने प्रवेश नाकारला आहे.

coronavirus
करोना व्हायरस चाचणी

नागपूरमध्ये एका व्यक्तीला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या व्यक्तीची करोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. मात्र, याचा फटका त्यांच्या मुलांना बसला आहे. ज्या व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. त्या व्यक्तीची मुलगी शाळेत शिकत असून मुलगा महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. मात्र, त्यांच्या वडिलांना करोनाची लागण झाल्यामुळे शाळा आणि महाविद्यालय प्रशासनाने त्यांच्या मुलांना शाळेत आणि महाविद्यालयात प्रवेश देण्यास नकार दिला आहे आहे.

नेमके काय घडले?

अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. नागपुरातला पहिलाच रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. या व्यक्तीवर सध्या इंदिरा गांधी शासकीय रूग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, या व्यक्तीची मुलगी गुरुवारी सकाळी शाळेत गेल्यानंतर शाळा प्रशासनाने तिला खबरदारीचा उपाय म्हणून प्रवेश नाकारला. मात्र, या प्रकारामुळे पालक संतप्त झाले. करोनाबाधितांची नावे उघड न करण्याचे आवाहन सरकारने केल्यामुळे सुरुवातीला पालकांना याबाबत कोणतीच माहिती देण्यात आली नाही. परंतु त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे शाळेला नाईलाजाने विद्यार्थीनीला प्रवेश नाकारण्याचे कारण स्पष्ट करावे लागले.

दरम्यान, या करोनाबाधित व्यक्तीचा मुलगा नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये गेला असता. त्याला देखील महाविद्यालयामध्ये प्रवेश देण्यास नकार दिला आहे.


हेही वाचा – अमेरिका रिटर्न व्यक्ती करोना पॉझिटिव्ह’