घरताज्या घडामोडीकोल्हापुरातील गोकुळ एमआयडीसीमधील कंपनीला भीषण आग

कोल्हापुरातील गोकुळ एमआयडीसीमधील कंपनीला भीषण आग

Subscribe

कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधील सेराफ्लेक्स युनिटमध्ये आग लागली आहे. संपूर्ण कंपनी आगीच्या भक्षस्थानी पडली आहे. शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाटी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधील सेराफ्लेक्स युनिटमध्ये आग लागली आहे. संपूर्ण कंपनी आगीच्या भक्षस्थानी पडली आहे. शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाटी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. (A major fire broke out at a company in Gokul MIDC Kolhapur)

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधील सेराफ्लेक्स युनिटमध्ये आग लागली. कंपनीत आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या आतापर्यंत ५ ते ६ गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे पर्यत्न केले जात आहेत.

- Advertisement -

गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधील सेराफ्लेक्स युनिटमध्ये लागलेली आग भीषण असून, धुराचे लोट आजूबाजूच्या परिसरात पररत आहेत. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी आग लागली आहे. त्याठिकाणी सिलिंडर असून, ते आगीमुळे बाहेर फेकले जात आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या परिसराता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सेराफ्लेक्स युनिटमध्ये लागलेल्या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. शिवाय जीवितहानीची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, आग लागल्यानंतर कंपनीमध्ये कर्मचारी अडकले आहेत का याची तपासणी अग्निशमन दलाकडून केली जात आहे. अग्निशमन दलाचे जवानही आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, ज्या कंपनीला आग लागली आहे, ती कंपनी आगीच्या भक्षस्थानी पडली आहे. शिवाय या कंपनीच्या बाजूला अनेक कंपन्या आहेत. त्यामुळे ही आग इतर कंपनीला लागू नये यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, कर्मचारी पहिल्यांदाच बाहेर पडल्याचं समजतं. मात्र, याबाबत अजून कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. जीवितहानी टाळण्यासाठी ॲम्बुलन्स आग लागलेल्या परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत. गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये अनेक कंपन्या आहेत. केमिकल कंपनीत आग लागल्यानं इतर कंपन्यांकडं आग पसरू नये, यासाठी काळजी घेतली जात आहे. ही आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.


हेही वाचा – …तर मी पहिली पदवीधर महिला आमदार असेन; शुभांगी पाटील यांचा दावा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -