घरदेश-विदेशहिंसाचार होत नसल्याच्या दाव्यानंतरही 'भारत जोडो यात्रेत' काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना धक्काबुक्की

हिंसाचार होत नसल्याच्या दाव्यानंतरही ‘भारत जोडो यात्रेत’ काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना धक्काबुक्की

Subscribe

नवी दिल्ली : पंजाबच्या लुधियाना शहरातील समराला चौकात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष राजा वडिंग यांना धक्काबुक्की झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंतच्या यात्रेत कुठेही हिंसाचार झाला नसल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. पण नेत्याला धक्काबुक्की झाल्याची ही दुसरी घटना आहे.

भारत जोडो यात्रा काल, शुक्रवारी समराला चौकात आल्यावर अन्य एका काँग्रेस नेत्याची राहुल गांधी यांच्याशी गाठभेट घालून देण्यासाठी राजा वडिंग समोर आले असता, सुरक्षा रक्षकांनी त्यांना धक्का दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. वडिंग यांनी प्रोटोकॉल तोडल्याने त्यांना धक्का देऊन बाजूला करण्यात आले, असे सांगण्यात येते.

- Advertisement -

 

गेल्या महिन्यात भारत जोडो यात्रा राजधानी दिल्लीत पोहोचल्यावर लाल किल्ल्याजवळ राहुल गांधी यांनी भाषण केले. हिंदू धर्मात कुठे लिहिले आहे की, दुर्बलांना मारा? मी गीताउपनिषदे वाचली, पण त्यामध्ये कुठेही असे लिहिलेले नाही. भाजपा सरकार भीतीचे वातावरण तयार करत आहे. हे सरकार चोवीस तास भीती पसरवण्यात मग्न आहे, असे सांगून राहुल गांधी म्हणाले की, या यात्रेत कुत्रे, गायी वगैरे वेगवेगळे प्राणी आले, पण त्यांना कोणी मारले नाही. कुठेही हिंसाचाराच्या घटना घडल्या नाहीत.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी असा दावा केलेला असला तरी, काल पंजाबच्या प्रदेशाध्यक्षांना धक्काबुक्की झाली. एवढेच नव्हे तर, नोव्हेंबर 2022मध्ये महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील राऊत यांनाही सुरक्षारक्षकांकडून धक्काबुक्की झाल्याचे समोर आले होते. त्यात तोल जाऊन ते खाली पडले होते. त्यांच्या डोळ्याजवळ मार लागला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -