घरदेश-विदेश"...जय भवानी, जय शिवाजी म्हणत मते मागणार", उद्धव ठाकरेंचे थेट निवडणूक आयोगाला आव्हान

“…जय भवानी, जय शिवाजी म्हणत मते मागणार”, उद्धव ठाकरेंचे थेट निवडणूक आयोगाला आव्हान

Subscribe

मुंबई : शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  निवडणूक आयोगाला पत्र लिहिले. निवडणूक आयोग भाजप आणि आम्हला वेगळ न्याय का?, निवडणूक आयोगाने आचारसंहितेत काही बदल केले आहे का? जर बदल केले असतील तर ते कधी, केव्हा केले. याबद्दल निवडणूक आयोगाने भाजपला फक्त सांगितले आणि आम्हाला का नाही? आणि पंतप्रधान ‘बजरंग बली की जय’ म्हणत बटन दाबण्याचे आवाहन करतात. मग आम्ही जनतेला जय भवानी…जय शिवानी, हर हर महादेव म्हणत मतदान करा, असे आवाहन करू, असे थेट आव्हान उद्धव ठाकरेंनी केंद्रीय निवणूक आयोगाला केले आहे.

निवडणूक आयोगाला लिहलेल्या पत्रसंदर्भात उद्धव ठाकरे म्हणाले, “पंतप्रधान मतदान करताना ‘बजरंग बली की जय’ म्हणत बटन दाबण्याचे आवाहन करत आहेत. तर येत्या निवडणुकीत जय भवानी…जय शिवानी, हर हर महादेव, जय श्री राम म्हणून मतदान करा आणि राज्यकर्त्यांना बुद्धी मिळावे म्हणून गणपती बप्पा मोरया म्हणून देखील मतदान करा. यासंदर्भात निवडणूक आयोगाने खुलासा करण्याची गरज आहे. मग बाळासाहेब ठाकरेंना दिलेली शिक्षा योग्य होती की, आता पंतप्रधान आणि गृहमंत्री जे करत आहेत. ते योग्य आहे. हे निवडणूक आयोगाने आचासंहितेत काही बदल केला असेल, तर तो केव्हा, कधी केला आणि तो बदल फक्त भाजपला फक्त सांगितला आणि आम्हाला का नाही. यासंदर्भात पत्र निवडणूक आयोगाला पाठविले आहे, असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – माधुरी दीक्षित भाजपकडून निवडणूक लढवणार; भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून स्पष्टीकरण

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “यापूर्वी निवडणूक आयोग या सर्व गोष्टींची स्वत:हून दखल घेत होत होती. आता देखील केंद्रीय निवडणूक आयोगाने राहुल गांधी, प्रियांका गांधी, अरविंद केजरीवाल या सर्वांना स्वत:हून नोटीस पाठविली आहे. म्हणजे निवडणूक आयोग जागरुक आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – अद्वय हिरेंवरील कारवाई राजकीय दबावातून, संजय राऊतांचे सरकारवर गंभीर आरोप

‘या’मुळे बाळासाहेब ठाकरेंचा मतदानाचा अधिकार काढला

बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्यावर लढलेल्या निवडणुकीची आठवण सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले, “1987 साली पार्ल्यामध्ये पोट निवडणूक झाली होती. या निवडणुकीत भाजपने शिवसेनाविरोधात ही निवडणूक लढली होती. शिवसेनेकडून रमेश प्रभू विजय झाले होते. ही देशातील पहिली निवडणूक होती. जी हिंदुत्वाच्या मुद्यावर लढली आणि जिंकली होती. या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपचे सरकार आले. तोपर्यंत शिवसेनेच्या पाच ते सहा आमदार यात सुभाष देसाई, सुर्यकांत महाडिक, रमाकात मयेकर बापू खेडेकर, रमेश प्रभू हे सर्वांना बाद ठरवले. त्यावेळी निवडणूक आयोगाने सर्वांच्यासह बाळासाहेब ठाकरेंचा सुद्धा मतदानाचा अधिकार काढून घेतला होता. हे सर्व जण सहा वर्षासाठी मतदान करणार नव्हते. कारण हिंदुत्वाचा प्रचार करण्यात आला होता. त्यावेळी देशात हिंदुत्वाबद्दल बोलत नव्हते. तेव्हा फक्त ‘गर्व से कहो, हम हिंदू हैं’ हा नारा हिंदू विश्व परिषदेने दिला असला. पण हा नारा बाळासाहेब ठाकरेंनी बुलंद केला आहे. तेव्हा केवळ मंदिर वही मनाये गें, असा नारा देत निवडणूक लढवली होती. पण तेव्हा निवडणूक आयोगाने मतदानाचा अधिकार काढला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -