घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रऐकावं ते नवल : या देशातील स्मशानभूमी ठरतेय पर्यटकांचे आकर्षण

ऐकावं ते नवल : या देशातील स्मशानभूमी ठरतेय पर्यटकांचे आकर्षण

Subscribe

जग अनेक विचित्र गोष्टींनी भरले आहे. काही गोष्टी माणसाच्या बुद्धीच्या पलीकडच्या आहेत. जगात अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत, जिथे गेल्यावर आपण थक्कच होतो. पर्यटनासाठी विविध ठिकाणी भेटी दिल्या जातात. कुटुंबासोबत वेळ घालवता यावा हा त्यामागचा हेतू असतो. परंतु, म्हणून कुणी स्मशानभूमी पाहायला जात नाही. कळल्यावर नक्कीच धक्का बसेल.

परंतु, अशी एक स्मशानभूमी आहे, जिथे पर्यटक फिरायला येतात. मृत व्यक्तीवर त्याच्या धर्मानुसार अंत्यसंस्कार केले जातात. ख्रिश्चनांमध्ये दफन करण्याची पद्धत असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबीयाचा, नातेवाईकाचा किंवा कोणी मित्र अथवा स्नेह्याचा मृत्यू होतो, तेव्हा त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी कब्रस्तानात किंवा स्मशानभूमीत प्रवेश केला जातो; मात्र कब्रस्तानात मुद्दाम कोणी फिरायला जात नाही. कारण तिथले एकंदर वातावरण गंभीर, शांत आणि भीतिदायक असते. परंतु, रोमानियातले एक कब्रस्तान पर्यटकांसाठी आकर्षण ठरतंय. या आकर्षणामागे काही कारणे आहेत. या कब्रस्तानतील लक्षणीय गोष्ट अशी, की तिथल्या प्रत्येक थडग्यावर रंगीबेरंगी दगड लावले आहेत.

- Advertisement -

या सगळ्या दगडांवर त्या मृत व्यक्तीच्या आयुष्यातल्या काही गोष्टी लिहिल्या आहेत. तसेच या दगडांवर मृत व्यक्तीचे चित्रही आहे. या कब्रस्तानात आल्यावर पर्यटकाला प्रत्येक थडग्यातल्या व्यक्तीविषयी माहिती मिळते. त्या व्यक्तीचा मृत्यू कधी झाला, जिवंत असताना व्यवसाय/पेशा कोणता होता आदी गोष्टींची सगळी माहिती मिळते. हे अजब, जगावेगळे कब्रस्तान रोमानियात आहे. मारा मरोश या रोमानियातल्या एका छोट्याशा गावात हे कब्रस्तान असून, त्याच गावातल्या स्तान इओन पत्रास या एका कलाकाराच्या कल्पनेतून या जगावेगळ्या कब्रस्तानाची निर्मिती करण्यात आली आहे. या कलाकाराने या कब्रस्तानाचा खर्‍या अर्थाने कायापालट केला. यामुळे आता तिथे पर्यटकांची गर्दी वाढते आहे. मेरी सिमेट्री म्हणून हे कब्रस्तान परिचित आहे. त्यातल्या प्रत्येक थडग्यावर संबंधित मृत व्यक्तीची माहिती पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. कब्रस्तान अशा प्रकारचे असू शकते हीच एक अजब गोष्ट आहे. याच्या वेगळेपणामुळेच हे कब्रस्तान सर्वांसाठी चर्चेचा विषय बनले आहे. त्याचे सारे श्रेय स्तान इओन पत्रास या कलाकाराला द्यावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -