घरCORONA UPDATEसिंधुदुर्गात क्वारंटाईन असलेल्या तरुणाला श्वास घेण्यास त्रास; उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू

सिंधुदुर्गात क्वारंटाईन असलेल्या तरुणाला श्वास घेण्यास त्रास; उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू

Subscribe

मुंबईतून कोकणात आलेल्या क्वॉरन्टाईन असलेल्या एका तरुणाला श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला.

मुंबईत कोरोनाने थैमान घातले असून चाकरमान्यांनी कोकणात धाव घेतली आहे. त्यामुळे शहरातला चाकरमानी मिळेल त्या वाहनाने किंवा पायी चालत येत आहेत. अशाच प्रकारे मुंबईतून कोकणात आलेल्या क्वॉरन्टाईन असलेल्या एका तरुणाला श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यातील गुळदुवे गावात ही घटना घडली. हा तरुण मुंबईतील मालाडहून कालच (२६ मे) आपल्या गावात आलेला हा तरुण शाळेत क्वॉरन्टाईन होता. या तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अजून स्पष्ट झालेलं नाही. या मृत युवकाचा स्वॅब नमुना घेऊन त्याचा अहवाल आल्यावर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

संबंधित तरुण आपल्या पत्नी आणि मुलीसह मालाडहून खासगी गाडी घेऊन काल गुळदुवे गावात आला होता. गावात आल्यानंतर मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करुन त्याला गुळदुवे इथल्या शाळेत क्वॉरन्टाईन करण्यात आलं होतं. परंतु रात्री अचानक या तरुणाला श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याला उपचारांसाठी शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

- Advertisement -

मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात या तरुणाची तपासणी केल्याने हे आरोग्य केंद्र आज खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आलं आहे. तसेच या आरोग्य केंद्रात कोणाचीही तपासणी होणार नाही, अशी माहिती डॉ. ठाकूर यांनी दिली आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या १७ असून त्यापैकी सात जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दहा जणांवर उपचार सुरु आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -