घरमहाराष्ट्रअबोली महिला रिक्षा चालकांना आता उबेरची साथ!

अबोली महिला रिक्षा चालकांना आता उबेरची साथ!

Subscribe

अबोली रीक्षांना आता उबेरशी संलग्ण केले आहे. त्यामुळे आता महिला रिक्षा चालकांची पुरुष रिक्षा चालकांच्या मुजोरीपासून सुटका झाली आहे.

ठाण्यामध्ये अबोली रिक्षांना आता उबेरशी संलग्न करण्यात आले आहे. त्यामुळे महिला रिक्षा चालकांना आता पुरुष रिक्षा चालकांच्या मुजोरीला सामना करावा लागणार नाही. अबोली रिक्षांना उबेरशी संलग्न केल्यामुळे महिला रिक्षा चालकांना त्यांच्या हक्काचे प्रवासी मिळणार आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून अनेक समस्यांना सामोरे जावे लागणाऱ्या अबोली महिला रिक्षा चालकांना उबेरचा भक्कम असा आधार मिळाला आहे.

पुरुष रिक्षा चालकांच्या मुजोरीवर तोडगा

महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदे लावून कामे करावी. गरजू महिलांना मदत मिळावी, यासाठी राज्य सरकारने अबोली योजनेमार्फत गरजू महिलांना कर्जावर रिक्षा दिल्या. या योजनेअंतर्गत ठाण्यात पहिली अबोली महिला रिक्षा धावली. परंतु, या रिक्षा चालक महिलांना पुरुष रिक्षा चालकांच्या मुजोरीचा सामना करावा लागत होता. पुरुष रिक्षा चालकांकडून होणाऱ्या त्रासामुळे त्यांना व्यावसाय करणे अवघड झाले होते. महिला रिक्षा चालकांनी रिक्षास्टॅण्डवर थांबून प्रवासी बसवले तर पुरुष रिक्षा चालक भांडण करत असल्याची तक्रार महिला चालकांकडून वारंवार येत होत्या. आपला व्यावसाय टिकावा म्हणून महिलांना स्वातंत्र्य थांबा मिळावा, अशी मागणी महिलांनी केली होती. अखेर याच्यावर सरकारने तोडगा काढला आहे. अबोली रिक्षांना उबेरशी संलग्ण करण्यात आले आहे. त्यामुळे स्वतंत्र्य थांबाचा मुद्दाच संपला आहे.

- Advertisement -

योजणेचे लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते 

ठाण्यामध्ये या याोजनेचा लोकार्पण सोहळा शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी, ठाण्याप्रमाणाचे कल्याण-डोंबिवलीमध्येही असे उपक्रम सुरु झाले तर गरजू महिलांना मदत होईल. त्याचबरोबर जर विदर्भ आणि मराठवाड्यात हा उपक्रम सुरु केला तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आधार मिळेल, असे मत आदित्य ठाकरे यांनी मांडले. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्याचबरोबर शिवसेनेच्या अनेक पदाधिकारी आणि मंत्रींनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -