सलमानला धमकीचे पत्र बिश्नोईनेच लिहिले, सौरभ महाकाळचा मुंबई पोलिसांकडे दावा

दिल्लीतील तिहार तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने धमकीचे पत्र लिहिल्यानंतर ते पत्र मुंबईत टाकण्यासाठी लॉरेन्सच्या टोळीतील तीन जण राजस्थानमधून मुंबईत आले होते. धमकीचे पत्र टाकल्यानंतर या तिघांनी आरोपी सौरभ महाकाळचीही भेट घेतल्याचे महाकाळने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना सांगितले.

salman khan to help tackle vaccine hesitancy in muslim areas in maharashtra said rajesh tope

बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनेच लिहिल्याचा दावा पुणे पोलिसांच्या अटकेत असलेला आरोपी सौरभ कांबळे उर्फ महाकाळने केला आहे. सलमान खान धमकी प्रकरणात महाकाळची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी पुणे गाठले असून तिथेच त्याने चौकशीदरम्यान हा दावा केला आहे.

दिल्लीतील तिहार तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने धमकीचे पत्र लिहिल्यानंतर ते पत्र मुंबईत टाकण्यासाठी लॉरेन्सच्या टोळीतील तीन जण राजस्थानमधून मुंबईत आले होते. धमकीचे पत्र टाकल्यानंतर या तिघांनी आरोपी सौरभ महाकाळचीही भेट घेतल्याचे महाकाळने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना सांगितले. हे पत्र टाकणार्‍यांची ओळख गुन्हे शाखेने पटवली असून त्यांच्याशी संबंधित काही धागेदोरेही पोलिसांच्या हाती लागले आहेत. लवकरच ते पकडले जातील, अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सलीम खान यांना मिळालेल्या धमकीपत्रात केवळ दोन ओळींचा संदेश होता. पत्राच्या शेवटी उल्लेख असलेले जी. बी. आणि एल. बी. हे गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्या नावांचे शॉर्टफॉर्म असल्याचे म्हटले जात आहे. बिश्नोई समाज काळविटाला पवित्र मानतो. त्यामुळे त्याची शिकार केल्याचा आरोप असलेल्या सलमान खानला मारण्याची धमकी लॉरेन्सने २००८मध्ये कोर्टाबाहेर दिली होती.