घरमहाराष्ट्र"शिवसेनेला संपवण्याचा भाजपाचा डाव" असं म्हणत आदित्य ठाकरेंनी दिला भाजपाला इशारा

“शिवसेनेला संपवण्याचा भाजपाचा डाव” असं म्हणत आदित्य ठाकरेंनी दिला भाजपाला इशारा

Subscribe

दरम्यान आदित्य ठाकरे हे त्यांचा हैद्राबाद दौऱ्यावरून परतल्यानंतर भाजपाला दिलेला इशारा येत्या नव्या राजकीय डावपेचाची चाहुल आहे की काय? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

शिवसेना आमदाराच्या बंडापासून सुरू झालेला भाजप आणि ठाकरे गटातला संघर्ष दिवसेंदिवस आणखी पेटत चालला आहे. अशात शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे सुद्दा ठाकरे गटाकडून काढून घेण्यात शिंदे फडणवीस सरकारला यश मिळालं. त्यानंतर तर ठाकरे गट आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये हायव्होल्टेज सामना रंगलाय. दोन्ही पक्षाकडून आता येत्या काळात येणाऱ्या निवडणूकींसाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. यावरून आता आदित्य ठाकरेंनी थेट भाजपाला इशाराच दिलाय.

महाराष्ट्रातील युवा नेते आदित्य ठाकरे आज हैदराबाद दौऱ्यावर गेले होते. यावेळी आदित्य ठाकरेंनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचीही भेट घेतली. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि के टी राव यांची एक बैठकही झाली. के टीराव हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांचे पुत्र असून ते तेलंगणाचे नगरविकास मंत्री आहे. खरंतर आदित्य ठाकरे हे हैदराबादमध्ये जाण्यामागील काय कारण असणार याबाबत राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. एकीकडे बीआरएस पक्ष देखील महाराष्ट्रात प्रवेश करू इच्छित असताना आदित्य ठाकरेंचं त्यांना भेटणं हे येत्या काळातली नवी राजकीय चाल आहे की काय, अशी शंका देखील उपस्थित करण्यात येतेय. महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या अरविंद केजरीवाल यांनीही मातोश्रीवर जाऊन ठाकरे कुटुंबाची भेट घेतली होती. त्यामुळे ठाकरे गट येत्या निवडणूकांसाठी दंड ठोपाटून तयारीला लागले आहे.

- Advertisement -

हे ही वाचा: ‘चोर आले पन्नास खोके घेऊन’ गाण्याचा रॅपर कुठे आहे? जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट

आदित्य ठाकरे हैद्राबादचा दौरा आटोपून पुन्हा मुंबईत परतले तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना भाजपाला इशारा दिलाय. भाजप आणि देवेंद्र फडणवीसांना शिवसेना संपवायची आहे. शिवसेना संपवणं हेच भाजपचं ध्येय असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेनेचा संपवण्याचा भाजपाचा डाव आहे. पुण्यात हू इज धंगेकर विचारल्यानंतर काय होतं हे सर्वांना दिसलं आहे. आता राज्यात हू इज शिवसेना विचारलंय…आता बघा महाराष्ट्रात काय होतंय? महाराष्ट्रातच नव्हे तर देशात काय होतंय ते बघाच…” असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपाला चॅलेंज दिलंय.

- Advertisement -

हे ही वाचा: “मविआच्या भविष्याबाबत सांगता येणार नाही”, शरद पवारांकडून मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत?

तसंच हिंदुह्रदय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना ही दोन्ही नावे संपवून भाजपाला राज्य काबीज करायचं. त्यानंतर महाराष्ट्राचे पाच तुकडे तोडायचे हे भाजपचं स्वप्न दिसत आहे, असं देखील यावेळी आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

हे ही वाचा: बाबरी पाडली तेव्हा उद्धव कुठे होते? त्यांना यावर बोलण्याचा अधिकार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दरम्यान आदित्य ठाकरे हे त्यांचा हैद्राबाद दौऱ्यावरून परतल्यानंतर भाजपाला दिलेला इशारा येत्या नव्या राजकीय डावपेचाची चाहुल आहे की काय? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -